दूध भेसळ करणारे रॕकेट पकडले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील दूध भेसळ करणारे रॅकेट उध्वस्त करण्यात आले आहे.
कृत्रीम भेसळीचे दूध बनवणाऱ्यांसह दोन दूध संकलन केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. सुमारे १ हजार ३०३ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. या दुधाची किंमत साधारणपणे ५० हजार २६४ रुपये आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता नगर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून ही मोठी कारवाई केल्याने राहुरी तालुक्यात भेसळ युक्त दूध तयार करून विक्री करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे