खूशखबर! पीएम किसानचे पैसे दुप्पट होणार, 2000 ऐवजी 4000 मिळणार, सरकारची नेमकी योजना काय?
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत लाभ मिळवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच शेतकऱ्यांना मिळणारी 2000 रुपयांची ही रक्कम दुप्पट होण्याची शक्यता आहे. काही मीडिया अहवालांनुसार रिपोर्ट्सनुसार मोदी सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम डबल करण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना दर वर्षाला 6000 रुपयांऐवजी 12000 रुपयांची रक्कम मिळू शकते. मीडिया अहवालांच्या मते, बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी अलीकडेच दिल्लीमध्ये केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पीएम शेतकरी सन्मान निधीचे पैसे दुप्पट करण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली. दरम्यान अद्याप यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
सध्या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वर्षभरात शेतकऱ्यांना 2000 रुपयांचे तीन या मिळतात, आता हा हप्ता 4000 रुपये होण्याची शक्यता आहे. ही योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा म्हणून राबवली जाते. मोदी सरकार कडून या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. ही योजना 2019 मध्ये मोदी सरकारने सुरू केली होती. या योजनेअंतर्गत वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो. प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता असतो.