महाराष्ट्र
575
10
बंद पडलेली स्ट्रीट लाईट दुरुस्त करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू- भाऊसाहेब धस
By Admin
बंद पडलेली स्ट्रीट लाईट दुरुस्त करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू- भाऊसाहेब धस
पाथर्डी प्रतिनिधी :
पाथर्डी शहरातील हंडाळवाडी ते पाथर्डी मुख्य रस्त्यावरील बंद पडलेली स्ट्रीट लाईट त्वरित दुरुस्त करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भाऊसाहेब धस ,युवासेनेचे दत्तात्रय दराडे व परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी अय्युब सय्यद यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, दुधसंघ ते हंडाळवाडी रस्त्यावरील स्ट्रीट लाईट दुरुस्त करण्याबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही अद्यापर्यंत पालिकेने कोणतीही दुरुस्ती केलेली नाही . तसेच दूधसंघ ते हंडाळवाडी रस्त्यावर मोठे- मोठे खड्डे पडले असून रस्ता अत्यंत खराब झाला आहे. तरी विविध समस्याची त्वरित पाहणी करून सहा दिवसात सोडवणूक करावी, अन्यथा बुधवार दि ८ रोजी शिवसेनेच्या वतीने नगरपालिका कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल. यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास अथवा शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पाथर्डी नगरपरिषदेवर राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी बोलताना माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब धस म्हणाले, गेल्या चार वर्षापासून पालिकेने सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून शहरात व हंडाळवाडी परिसरात स्टीट लाईट बसवले . मात्र काही दिवसातच ते सर्व लाईट बंद पडले .सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे उदघाटन झाल्यानंतर दोन महिन्यातच बल्ब बंद पडून व त्यावरील वायरिंग खराब होऊन स्टीटलाईट शोभेची वस्तू बनली.अनेकवेळा आम्ही निवेदन दिले, मात्र पालिकेने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे रात्री-बेरात्री अंधाराचा फायदा घेऊन वस्तीवर चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे . दुधसंघ ते हंडाळवाडी रस्ता अत्यंत दयनीय झाला असून पालिकेने निदान येथील खड्डे तरी बुजवावेत, मात्र पालिकेचे अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत . रस्त्याला खड्डे पडल्यामुळे अनेक अपघात होऊन नागरिक जखमी झाले आहेत.
युवासेनेचे दत्तात्रय दराडे म्हणाले, नगरपालिकेची 'आंधळं दळतं आणी कुत्र पीठ खांत' अशी अवस्था झाली आहे. आतापर्यंत झालेली सर्व कामे ही निकृष्ट दर्जाची झालेली असून अधिकारी ठेकेदाराची पाठराखण करत आहे .या मागचे काय गोडबंगाल आहे, हे नागरीकांना अजुन पर्यंत कळालेच नाही. येत्या बुधवारपर्यंत हंडाळवाडी परिसरातील नागरिकांच्या समस्या दूर केल्या नाहीत तर, आम्ही पालिके विरुद्ध शिवसेना स्टाईलने आंदोलन करू .
या निवेदनावर शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब धस , युवासेनेचे दत्तात्रय दराडे, सुनिल परदेशी , आदेश काकडे ,आदिनाथ गीते ,जनार्धन उराडे , बाळू पवार , विकास दिनकर ,अनिल भापकर, जब्बार पठाण , बाळासाहेब धस , अशोक भापकर ,संतोष शेळके ,गोलू भाबड, दत्ता पवार आदींच्या सह्या आहेत.
Tags :

