पाथर्डी- उपमुख्यमंञ्याकडे तक्रार करणार
पाथर्डी-
नगर सिटीझन प्रतिनिधी
पाथर्डी : ‘टीका करताना आम्हाला भान शिकविणाऱ्यांनी जनतेची दिशाभूल करताना तरी भान बाळगावे. बाजार समितीवर भूखंड विकल्याचा आरोप करणाऱ्यांनी जरा भूतकाळात डोकावे. बाजार समितीच्या आमच्या कार्यकाळात पारदर्शक कारभार करत आम्ही ७४ पैकी केवळ सहा भूखंडांचे वाटप केले. मग उर्वरित भूखांचे श्रीखंड कुणी खाल्ले ? भगवानगड व परिसराच्या पाणी योजनेवरून पितळ उघडे पडत असल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळण्यासाठी मतदारसंघाचे आमदार केविलवाणा प्रयत्न करत आहेत. नगरपालिका कारभाराचे वाभाडे तर जनताच काढत आहे. मागच्या पाच वर्षात कोट्यवधींचा भ्रष्टाचार पालिकेत झाला. बाजार समितीच्या मागच्या १६ वर्षांतील व पालिकेच्या मागच्या पाच वर्षांच्या कामकाजाची चौकशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांकडे करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, नगरसेवक बंडू बोरुडे व अन्य पदाधिकाऱ्यांनी एक निवेदनाद्वारे केली आहे.