जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख म्हणाले सुशिक्षितांना रोजगार उपलब्ध करुन देणार
अहमदनगर- प्रतिनिधी
दोन्ही कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध करण्यात कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मिळालेले मंत्रिपद जनतेमुळे आहे. मंत्रिपदाची हवा डोक्यात जावू न देता शेतकरी हित व सुशिक्षितांना रोजगार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देणार आहे.
सदैव जनतेच्या सेवेसाठी कटीबद्ध राहू. पाण्याने समृद्ध असणारा गोदावरी पट्ट्यातील शेतकरी हा खऱ्या अर्थाने नशीबवान आहे. जोडीला ते कष्ट घेतात. त्यामुळे ही समृद्धी येथे दिसून येते.
तालुक्यातील सर्वच गावांना विकासकामात प्राधान्य देणार आहे, असा विश्वास जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला.
नेवासे तालुक्यातील गिडेगाव येथे मुळा कारखाना पदाधिकारी व जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडीबद्दल मृद व जलसंधारण मंत्री गडाख यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक सरपंच भगवानराव कर्डिले यानी केले. सूत्रसंचालन डाॅ. रेवन्नाथ पवार यांनी केले. 'मुळा'चे उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले यांनी आभार मानले. कॅबिनेट मंत्री गडाख यांनी कार्यक्रम संपल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये दाळबट्टी जेवनाचा आस्वाद घेतला.