महाराष्ट्र
45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पोलिसांनी पकडली
By Admin
45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे पोलिसांनी पकडली
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवासा शहरात 45 हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची 8 जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहेत.
याबाबद पोकॉ रवि गोविंद पवार सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले आहे की, दि.
3/7/2022 रोजी सकाळी 10.30 वाजेचे सुमारास मी, पोसई भाटेवाल , पोहेकॉ गिते असे आम्हाला ठाणे अंमलदार सफौ कानडे यांनी बोलावुन कळविले की, यावेळी अहमदनगर कंट्रोल यांनी फोनद्वारे कळविले की, पशु वैद्यकिय अधिकारी आबासाहेब नाईकवाडी यांनी कंट्रोल येथे फोन करुन कळविले की, नेवासा शहरात आयशा मज्जीदचे पाठीमागे आयाज चौधरी व आब्बास चौधरी यांनी पन्नास ते साठ गोवंश गायी बांधुन ठेवल्या आहे. तसेच सिद्दीक चौधरी यांनी तीन गाया कापुन त्याची विक्री चालू आहे असे कळविलेवरुन सदर ठिकाणी खात्री करणेकामी आम्हाला जाण्यास सांगितल्याने आम्ही रवाना झालो. सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी लहान मोठी घराचे आसपास गोवंश जातीची जनावरे भुकेल्या अवस्थेत करकचुन दाव्याने बांधलेली दिसली. त्यानंतर आम्ही दोन पंच व सपोनि थोरात, पोना गायकवाड यांना घटना ठिकाणी खाजगी वाहन घेवुन बोलावुन घेतले. सदर जनावरांच्या मालकी बाबत आजु बाजुला विचारपुस केली असता सदर जनावरे हे अय्यास लालु चौधरी, अकिल जाफर चौधरी व मुस्ताक उस्मान शेख तीघेही रा. नाईकवाडी मोहल्ला, नेवासा खु. ता. नेवासा जि. अहमदनगर यांचे मालकीची असल्याचे आम्हास खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
सदर ठिकाणी 14 हजार रुपये किंमतीची एक काळे पांढरे रंगाची
दिड वर्षे वयाची जर्सी गाय,
10 हजार रुपये किंमतीची एक तांबड्या पांढरे रंगाची पुढे शिंगे
दोन वर्षे वयाची असणारी गाय,
3 हजार रुपये किंमतीची एक काळे पांढरे रंगाची सहा महिने वयाची कालवड, 3 हजार रुपये किंमतीची एक काळे सं.ची पांढरी शेपुट असलेली कालदड, 4 हजार रुपये किंमतीचा एक तांबड्या रंगाचा आठ महिने वयाचा
गोऱ्हा, 2 हजार रुपये किंमतीचा एक काळ्या पांढऱ्या रंगाचा आठ महिने वयाचा गोऱ्हा,5 हजार रुपये किंमतीचा एक पांढरा कोसा रंगाचा दोन वर्षे वयाचा गोऱ्हा, 4 हजार रुपये किंमतीचा एक काळे रंगाचा गळ्याजवळ पांढरे ठिपके असलेला गोऱ्हा असे एकूण 45 हजार रुपये
किंमतीचे गोवंश जातीची जनावरे दाव्यांनी करकचून बांधलेली भुकेली व तहानलेली मिळुन आलेने सदरची जनावरे आम्ही सोबत आणलेल्या पंचासमक्ष पोहेकाँ गिते यांनी पंचनामा करुन ताब्यात घेतली सदर जनावरांची जागीच पशुवैदयकीय अधिकारी नेवासा खु. यांना लेखी पत्र देवून त्यांचेकडुन तपासणी करुन घेतली. तसेच सदरची जनावरे सुरक्षीत ठेवुन सांभाळ करण्यासाठी आनंद गो संरक्षण संस्था खडका फाटा ता. नेवासा यांना लेखी पत्र देवुन सांभाळ करुन सुरक्षीत ठेवण्यासाठी जमा केली आहेत.
या फिर्यादीवरून अय्यास लालु चौधरी, अकिल जाफर चौधरी, मुस्ताक उस्मान शेख तीघे रा. नाईकवाडी मोहल्ला, नेवासा खु. ता. नेवासा यांचे विरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात भारताच्या प्राण्यास निर्दयपणे वागविण्याचा अधि नियम 1960 चे कलम 11(1) (एच) व महा प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5 (ब) व 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags :
4348
10