महाराष्ट्र
Olxवर कार विक्रीची जाहिरात देऊन साडेसहा लाखांची फसवणूक; एकास अटक
By Admin
Olxवर कार विक्रीची जाहिरात देऊन साडेसहा लाखांची फसवणूक; एकास अटक
OLX वरुन कार घ्यायचा विचार करताय? जाणून घ्या चोरांची मोड्स ऑपरेंडी!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
एसयूव्ही गाडी विकण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने ओएलएक्सवर कार विक्रीची जाहिरात दिली. या जाहिरातीला भुललेल्या सॉफ्टवेअर व्यावसायिकाची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. चाकणमध्ये ही घटना घडली. वापरलेली जुनी मोटार विकण्याचे आश्वासन देऊन एका व्यक्तीने 32 वर्षीय सॉफ्टवेअर व्यावसायिकाची जवळपास साडे सहा लाख रुपयांची फसवणूक केली. सहा लाख रुपयांची फसवणूक करून पळून जाणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिरंगा हॉटेल जवळ घडली आहे .
मिलिंद मधुकर गुंजाळ (वय 32, रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार सनी सुनील दाते (वय 21, रा. सुसगाव, ता. मुळशी, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह त्याचा काका आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला 1 हजार 100 रुपये टोकन रक्कम ऑनलाईन घेतली. त्यांनतर गुरुवारी दुपारी चाकण ( ता. खेड ) औद्योगिक भागात तिरंगा हॉटेलजवळ गुंजाळ यांना उर्वरित पैसे घेऊन बोलावले. गुंजाळ यांनी सहा लाख 20 हजार रुपये सनीला दिले. आरोपींनी गुंजाळ यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना कार न देता त्यांची फसवणूक करून पळ काढला. पोलिसांनी पळून जाणाऱ्या सनी दाते याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
मिलिंद मधुकर गुंजाळ, वय 32 वर्षे, धंदा नोकरी रा. संगमनेर जि. अहमदनगर यांनी चाकण पोलीस स्टेशन तक्रार नोंदवली होती. सनी अनिल दाते रा. पाषाण पुणे याने OLX अॅपवर मारूती सुझुकी ब्रिझा कार नंबर एम एच 12 पी एच 5554 ही विक्रीसाठी ठेवलेली होती. त्यावेळी मिलिंद गुंजाळ यांना सदर कार आवडल्याने त्यांनी सनी दाते याचे फोनवर फोन करून संपर्क केला. मी आर्थिक अडचणींमध्ये असल्याने मला सदर कार विक्री करायची आहे, असं त्यांनी म्हटलं. तेव्हा मिलिंद गुंजाळ हे सदर कार विकत घेण्यास तयार झाले. त्यांचा 6,70,000/- रु. मध्ये व्यवहार झाल्यानंतर सनी दाते याने 1100/- रूपये टोकनसाठी मागितल्याने त्यांनी 1100/- रू. ऑनलाईन पाठविले.
आणि गाडी घेऊन पळाला!
त्यानंतर सनी दाते याने मिलिंद गुंजाळ यांना गाडी खरेदीचे रोख रक्कम घेवून मेदनकरवाडी चाकण येथील तिरंगा हॉटेल जवळ बोलावले. तेव्हा मिलिंद गुंजाळ व त्यांचे सहकारी हे गाडी खरेदीसाठी रोख रक्कम घेवून गेले असताना आरोपी सनी दाते याने 6,20,000/- रोख रक्कम घेतली. गाडी आळंदी फाटयावर देतो, असे म्हणून फिर्यादी यांना ब्रिझा गाडीमध्ये आळंदी फाट्यावर घेवून गेला. त्यावेळी त्यांना फसवून गाडीतून खाली झेरॉक्स काढण्यासाठी उतरविले व सनी दाते हा गाडी घेवून पळून गेला. या तक्रारीवरून चाकण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अखेर जाळ्यात अडकला
यानंतर पोलिसांनी सदर गुन्ह्यातील आरोपी सनी सुनिल दाते यांची माहिती घेण्यास सुरूवात केली. सनी दाते याने फिर्यादीस दिलेल्या पत्त्याचे पाषान पुणे येथील घर दोन वर्षापूर्वी विक्री केलेले असल्याचे समजले. त्यानंतर आरोपीची गोपनीय माहिती तसेच त्याचे मोबाईल नंबरची तांत्रिक माहिती घेवून सदर आरोपीस कारसह अतिशय शिताफिने तळेगाव परीतसरात मुंबई-पुणे महामार्गावरील टोलनाक्यावर सापळा रचून ताब्यात घेतले.
आरोपीकडून गुन्हयातील ब्रिझाकार व तसेच फिर्यादी यांचे रोख रक्कम 6 लाख रुपये असा एकूण 12 लाख रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आल. गुन्हयातील आरोपी सनी सुनिल दाते वय 31 वर्षे, रा. सुसगाव पुणे याने OLX Appवर वरील ब्रिझा गाडी विक्रीसाठी ठेवून पुणे परीसरात आणखी ठिकाणी अशा प्रकारे लोकांची फसवणूक केली असल्याचे तपासात समोर आलंय. या बाबत लोकांना आवाहन करण्यात आले आहे की, सनी सुनिल दाते याने अशा प्रकारे कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी संबंधीत पोलीस स्टेशलला तक्रार दाखल करावी.
Tags :
22926
10