महाराष्ट्र
राजळे महाविद्यालयात जल व्यवस्थापनद्वारे ग्रामिण विकास विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र
By Admin
राजळे महाविद्यालयात जल व्यवस्थापनद्वारे ग्रामिण विकास विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कै. रमेश वरपुडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनपेठ,कालिकादेवी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व मिलीया कला विज्ञान व मॅनेजमेंट सायन्स महाविद्यालय प्राणीशास्त्र विभागांच्या तर्फे जलव्यवस्थानाद्वारे ग्रामिण विकास या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदचे शनिवार दि.७ मे २०२२ रोजीआयोजन करण्यात आले होते.उद्घाटक म्हणून दून विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डाॅ. कुसुम अरुणाचलम,(उत्तराखंड) प्रा. डॉ. दिलीप कुमार झा ( नेपाळ), प्रा. डॉ. विनय कुमार चक्रवर्ती ( बांग्लादेश) यांनी मार्गदर्शन केले.
दादापाटील राजळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आदिनाथ नगर, कै. रमेश वरपुडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनपेठ, कालिकादेवी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शिरूर कासार व मिलीया कला, विज्ञान व मॅनेजमेंट सायन्स महाविद्यालय, बीड यांच्या प्राणीशास्त्र विभागांच्या तर्फे जल व्यवस्थापनाद्वारे ग्रामीण विकास या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेत उद्घाटन पर भाषणामध्ये त्यांनी जलव्यवस्थापना सोबत , वातावरणातील बदल व त्यांचे होणारे परिणाम, मत्स्यपालना सोबतच एकात्मिक मत्स्य पालन करणे गरजेचे आहे, तरच गावांचा विकास होईल,असे विचार माडंले. सोबत प्राचार्य डॉ राजधर टेमकर यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत केले व अशा प्रकारचे चर्चासत्र भविष्यामध्ये सुद्धा व्हावे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होईल असे सांगितले.
सर्वप्रथम प्राचार्य डॉ.राजधर टेमकर यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत केले व अशा प्रकारचे चर्चासत्र भविष्यामध्ये सुद्धा व्हावे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होईल असे सांगितले.
पहिल्या सत्रामध्ये प्रा. डॉ. दिलीप कुमार झा यांनी आपल्या भाषणामध्ये नेपाळमधील जलव्यवस्थापन यावर भाष्य केले. त्यांनी जल व्यवस्थापनासाठी लागणारे शेततळे करून त्यामध्ये मत्स्य पालना सोबतच बाकीच्या प्राण्यांचा सुद्धा संगोपन करावे, असे सांगितले.सोबतच त्यांनी विद्यार्थ्यांनी नवनवीन प्रयत्न करून मस्यपालन या क्षेत्रांत उत्तुंग भरारी घ्यावी, असे म्हटले.पहिल्या सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी खेड्यांमध्ये रोजगार निर्मितीसाठी जलव्यवस्थापन कसे महत्त्वाचे आहे, असे आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. डॉ. विनय कुमार चक्रवर्ती यांनी बांग्लादेशाचे जलयव्यवस्थापन आणि गावांचा विकास यावर भाष्य केले व असे नवनवीन प्रकार भारत व बांगलादेश येथील खेड्यांमध्ये एकत्रितपणे केला तर भविष्यामध्ये जल व्यवस्थापनाचे चांगले परिणाम दिसतील,असे सांगितले. दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे यांनी अध्यक्षीय भाषणात जल व्यवस्थापनाचे महत्त्व व आपण जगाच्या पाठीवर कुठे आहोत, या विषयी माहिती सांगितली.
प्राचार्य डॉ. फजल यांनी सर्व मान्यवर वक्त्यांचे आभार मानले. प्रा. डॉ. तनवीर पठाण यांनी हे चर्चासत्र आयोजित करण्याची कल्पना विशद केली. प्रा. डॉ. सैरी अब्दुल्ला यांनी आभार मानले. प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील यांनी चर्चासत्राच्या उद्घाटकांचा परिचय करून दिला. प्रा. डॉ. संतोष रणखांब यांनी प्रमुख वक्ते यांचा परिचय करून दिला. प्रा. डॉ. अतुल चौरपगार यांनी आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.या चर्चा सत्रात जवळपास २८१ विद्यार्थी, संशोधक शिक्षक व प्राध्यापक सहभागी होते. चर्चासत्र आयोजित करण्यासाठी श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे, आमदार मोनिकाताई राजीव राजळे, सचिव जे.आर.पवार,आदर्श शिक्षण संस्था बीड चे सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ना. जयदत्त क्षिरसागर, हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ सोनपेठ चे अध्यक्ष परमेश्वर कदम आणि अंजुम इशात-ई तालिम,बीड या संस्थेच्या सचिव श्रीमती खान साबिया या चार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सचिव तसेच व्यवस्थापन सदस्य यांनी प्रोत्साहन व मार्गदर्शन केले.
Tags :
81
10