हंडाळवाडी सेवा सोसायटी चेअरमन व व्हॉइस चेअरमनची बिनविरोध निवड
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या हंडाळवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी बाळासाहेब शंकर हंडाळ (व्यापारी) यांची तर व्हाईस चेअरमनपदी रावसाहेब उत्तम हंडाळ (मुकादम) यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.
खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे व पाथर्डीचे मा. नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात सेवा सोसायटीचा कारभार प्रामाणिक व पारदर्शक पद्धतीने करून तालुक्यात या सोसायटीला नावलौकिक मिळवून देऊ, अशी ग्वाही नवनियुक्त संचालक मंडळाने यावेळी दिली. चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच निवडून आलेल्या सर्व संचालक मंडळाचा सत्कार अभय आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी नारायणबापू धस, लक्ष्मणराव हंडाळ, मधुकर महाजन, लक्ष्मणराव भापकर आदी मान्यवर उपस्थित होते.