गुणवंत विद्यार्थ्यांचा जवाहर विद्यालयाच्यावतीने सत्कार
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील जवाहर विद्यालयाच्या एसएससी परीक्षेत विद्यालयात प्रथम तीन आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मंगळवार दि. २८ जून रोजी विद्यालयाच्या प्रांगणात गौरव करण्यात आला.
विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक बाळासाहेब खेडकर, सदस्य संतोष वाघमारे, देविदास वाघमारे, विष्णू सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेत गुणानुक्रमे तीन विद्यार्थ्यांना मिळालेले गुण- प्रथम क्रमांक कु. वाघमारे ज्ञानेश्वरी संतोष ८९.६०%, द्वितीय क्रमांक कु. सोनवणे वैष्णवी संतोष ८९% व तृतीय क्रमांक वाघमारे प्रथमेश देविदास ८८% तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत कु. वाघमारे तनुजा पोपट या विद्यार्थिनीची ग्रामीण प्रवर्गातून गुणवत्ता यादीत निवड झाल्याबद्दल तिचाही गुणगौरव करून विद्यार्थ्यांच्या पालकांचा याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेडकर, विनायकराव खेडकर, संतोष वाघमारे, विष्णू सोनवणे, देविदास वाघमारे, एन. डी. फुंदे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता बडे यांनी केले तर व्ही. बी. खुटाळे यांनी आभार मानले.