चित्रकला परीक्षेत सावित्रीबाई फुले विद्यालयाचा १०० टक्के निकाल
पाथर्डी- प्रतिनिधी
आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठान आदिनाथनगर संचलित पाथर्डी शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालयाचा चित्रकला परीक्षेतील इंटरमिजिएट व एलिमेंटरी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
सन २०२१- २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला इंटरमिजिएट परीक्षेत कु. सानिका बागडे, संध्या धस, साक्षी जेधे, अंजली म्हस्के या विद्यार्थीनी 'अ' श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत. तसेच एलिमेंटरी परीक्षेत उम्मेमसीरा अतार, (अ श्रेणी) अर्शिया शेख (अ श्रेणी) व सबा सय्यद (ब श्रेणी) या विद्यार्थिनीने घवघवीत यश घेऊन उत्तीर्ण झाल्या.
या सर्व विद्यार्थिनींना कलाशिक्षक अय्युब पठाण व नगमा खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे, आमदार मोनिका राजळे, सचिव राहुल राजळे, भास्करराव गोरे तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.