शॉटसर्किटमुळे सुशिक्षित बेरोजगाराचे दुकान जळुन खाक,नऊ लाखाचे नुकसान
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगांव येथे रविवारी (दि.5) अंकुश बाबुराव दराडे या सुशिक्षित बेरोजगार युवकाचे किराणा व स्टेशनरी, झेरोक्स दुकान लाईट शॉटसर्किटमुळे जळुन खाक झाले आहे.
यामध्ये दुकानातील तीन फ्रिज, झेरॉक्स मशीन, लॅमीनेशन मशीन, इनव्हर्टर, इलेक्ट्रीक काटा , स्टेशनरी व किराणा माल मिळुन सुमारे 9 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे स्वरूप एवढे मोठ्या स्वरूपात होते की काही क्षणातच संपुर्ण दुकान जळुन खाक झाले. अंकुश दराडे हे सुशिक्षित बेरोजगार आहेत व त्यांनी बँकेकडून कर्ज घेतलेले आहे व त्याच्यांवर कुटुंबांची संपूर्ण जबाबदारी आहे. सध्या अंकुश दराडे यांचा संसार रस्त्यावर आल्यामुळे परीसरात मोठया प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. दराडे या सुशिक्षित बेरोजगार युवकास महावितरण कंपनी व तहसील आपत्ती विभागाने मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.