महाराष्ट्र
तरुणांचा मृतदेह शोधण्यासाठी गोदावरी नदी पात्रामध्ये पोलिसांचे अहोरात्र प्रयत्न
By Admin
तरुणांचा मृतदेह शोधण्यासाठी गोदावरी नदी पात्रामध्ये पोलिसांचे अहोरात्र प्रयत्न
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील तरुणाचे अपहरण केल्यानंतर खून करून दीपक बर्डे या तरुणाचा मृतदेह कमालपूर (ता. श्रीरामपूर) येथील बंधाऱ्यावरून नदीपात्रात टाकल्याची घटना घडली असून या घटने संदर्भात आज नेवासा तालुक्यातील रामडोह या परिसरातील गोदावरी नदी पात्रात तरुणांचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी भेट दिली व यावेळी त्यांनी पोलीस यंत्रणेला परिसरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आव्हान केले.
आज दि १५ रोजी गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तालुक्यातील रामडोह परिसरातील गोदावरी पात्रात सुरू असलेल्या शोध मोहीम ठिकाणी भेट दिली यावेळी त्यांनी परिसरातील नागरिकांशी व नदीपात्रात शोध घेत असलेल्या चप्पूधारक, व बोटं चालक तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बैठक घेऊन संवाद साधला
यावेळी बोलताना मनोज पाटील म्हणाले की गेल्या आठ दिवसापासून नदी पात्रात बोटीद्वारे शोध मोहीम सुरू आहे आज संपूर्ण गोदावरी परिसराची पाहणी केली चप्पू धारक यांची स्वतंत्र बैठक घेऊन नदी काठावरील एक फुटाच्या पाणी पातळी पर्यत शोध घेण्यासाठी सूचना दिल्या आहे तसेच सुमारें ५० चप्पू च्या आधारे १०/ १० किलोमीटर अंतरावर शोध मोहीम घेत आहोत बोट धारक, चप्पू धारक ,पोलीस पाटील व नागरिकांनी देखील पोलीसांना मदत करावी तसेच सध्या नदीपात्रात ८ अधिकाऱ्यांसह ७७ पोलीस कर्मचारी यांच्यासह पट्टीच्या पोहणाऱ्या १७ खासगी तरुणांसह गोदावरी पात्रात जायकवाडीच्या बॅकवॉटरमध्ये २ यांत्रिक (स्पीड बोट) व अन्य ४ अशा ६ बोटींद्वारे शोध घेत आहेत असे यावेळी ते म्हणाले यावेळी त्यांनी पोलीस आधिकारी याना योग्य सूचना केल्या
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, व शेवंगाव विभागाचे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस निरीक्षक विजय करे यांचेसह तीन पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक एक सहायक पोलीस निरीक्षक अशा ८ पोलीस अधिकाऱ्यांसह ७७ पोलीस कर्मचारी जायकवाडी जलाशयाचा फुगवटा असलेल्या प्रवरासंगम येथे गोदावरी नदीपात्रात अपहृत तरुणाचा शोध घेत आहेत.
नदीपात्र परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा उपलब्ध असून पोलीस कॉन्स्टेबल वसीम इनामदार, अंबादास गीते, गणेश इथापे, सुमित करंजकर, रामचंद्र वैद्य यांच्या सह सरपंच ज्ञानेश्वर बोरुडे, पोलीस पाटील संतोष घोगासें अशोक बोरुडे, सोमनाथ गोरे, कचरू परसईय्या , ज्ञानेश्वर भांडारे , रामेश्वर गोरे, संतोष गुंजाळ यांच्या सह मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते
पोलीस निरीक्षक करे गोदावरी परिसरात तळ ठोकून ..
एनडीआरएफ टीम, ४ रेग्युलर बोट व २ स्पीड बोटीच्या साहाय्याने तसेच पट्टीचे पोहणारे खाजगी १७ तरुणांची मदत घेऊन त्याना मानधन देऊन सर्वोतोपरी शोध मोहीम सुरू आहे आज यात ५० चप्पू धारक यांचा समावेश केला आहे करे यांच्या उपस्थितीत शोध मोहीम सुरू आहे
Tags :
6974
10