पाथर्डी मतदार संघातून दीपक बडे व निलेश क्षिरसागर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पाथर्डी - प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक निवडणुकीसाठी स्वराज्य प्राथमिक शिक्षक मंडळातर्फे पाथर्डी तालुकाध्यक्ष दिपक बडे यांनी पाथर्डी मतदारसंघातून सर्वसाधारण व एन टी प्रवर्गातून तसेच स्वराज्य मंडळाचे उपाध्यक्ष निलेश क्षीरसागर यांनी पाथर्डी मतदारसंघातून सर्वसाधारण प्रवर्गातून नुकताच निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दिपक बडे व निलेश क्षीरसागर यांनी अचानकपणे उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे स्वराज्य मंडळात उमेदवारीबाबत पाथर्डी मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे.
यावेळी स्वराज्य मंडळाचे जिल्हा नेते राजेंद्र ठोकळ, नेते योग थोरात, नेते नाना गाढवे, जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे, सरचिटणीस प्रतिक नेटके, कार्याध्यक्ष विजय शिंदे, पाथर्डी उपाध्यक्ष नितीन जाधव, राज चव्हाण, देवेंद्र आंबेटकर, महेश वाघमोडे, श्रीराम तुपे, प्रदीप साळवे, श्रीकांत फुटाणे, राज कदम, विनोद देशमुख, प्रताप नरवडे, भाऊसाहेब काळे, मकरंद गडदे, एकनाथ रहाटे, अरविंद थोरात आदी उपस्थित होते.