पाथर्डी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय बोरुडे, व्हॉ. चेअरमन नाना बालवे
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी कसबा येथील सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी संजय बोरुडे तर व्हा. चेअरमन पदी नाना बालवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
१३ संचालक असलेल्या या सोसायटी निवडणुकीत खोलेश्वर शेतकरी विकास पॅनल ने १३ पैकी ११ जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळवले.
माजी चेअरमन सुभाष बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली खोलेश्वर शेतकरी विकास पॅनेलने सत्ता मिळवली. सहाय्यक निबंधक कार्यालयात चेअरमन , व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीत दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक -एक अर्ज दाखल करण्यात आले होते. चेअरमन पदासाठी संजय बोरुडे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यास मधुकर महाजन सुचक तर सुभाष बोरुडे हे अनुमोदक होते. व्हाईस चेअरमन पदासाठी नाना बालवे यांचा एकमेव अर्ज दाखल होऊन त्यास सूचक नाथा साखरे तर अनुमोदक अरुण कोकाटे होते.
चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी बोरुडे , बालवे यांचे प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी डी.डी. पारधे यांनी चेअरमन पदी संजय बोरुडे तर व्हा. चेअरमन पदी नाना बालवे हे बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केली. सहाय्यक अधिकारी म्हणून नागेश चितळे, सोसायटीचे सचिव प्रशांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले. निवडीनंतर चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा संचालकाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष हिंदूकुमार औटी, माजी उपनगराध्यक्ष बंडूशेठ बोरुडे, बबन बुचकूल, नगरसेवक रमेश गोरे, महेश बोरुडे, प्रा. रमेश काटे, बाबू बोरुडे ,महेश काटे, अनिल एडके ,संचालक सुभाष बोरुडे, अरुण कोकाटे, गणपत परदेशी ,शंकर लबडे , अण्णासाहेब साखरे ,राजकुमार बोरुडे ,सुनिल एडके, मंदाकिनी बोरुडे ,मीरा काटे, खंडू सोनटक्के, मधुकर महाजन आदी उपस्थित होते.