आशा स्वयंसेविकांची तात्काळ नियुक्ती करा- मुकुंद गर्जे
पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरासाठी आशा स्वयंसेविकांची तात्काळ नियुक्ती करावी, या मागणीचे निवेदन तालुका आरोग्य अधिकारी भगवानराव दराडे यांना सोमवारी देण्यात आले. सदर निवेदन पाथर्डीचे सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या पाथर्डी शहराची २०११ च्या जनगणने नुसार २७२११ लोकसंख्या आहे. आजअखेर पाथर्डी शहराची लोकसंख्या जवळपास ३० ते ३५ हजार आहे. पाथर्डी शहरातील नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आशा स्वयंसेविका हा शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा दुवा आहे. त्यांच्या आरोग्य विषयक भूमिका आणि जबाबदाऱ्या खुप महत्वाच्या आहेत.
तरी शहरातील ३० ते ३५ हजार नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता आशा स्वयंसेविकांची तात्काळ नियुक्ती करावी, ही पाथर्डी शहरातील नागरिकांच्या वतीने नम्र विनंती आहे.
यावेळी मुकुंद भास्करराव गर्जे, नितीन एडके, ईजाज शेख, शहनवाज शेख, अण्णा हरेर, सुनील बेळगे आदींची उपस्थिती होती