महाराष्ट्र
अवैध वाळूउपशाचे हप्ते कुणाला? 'या' आमदाराने केली टिका
By Admin
अवैध वाळूउपशाचे हप्ते कुणाला? 'या' आमदाराने केली टिका
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महसूलमंत्र्यांच्या आशीर्वादाने राज्यभर वाळूचा गोरखधंदा सुरू आहे.
त्यांचेच बगलबच्चे या धंद्यात आहेत. ठाणे, पुणे आणि रायगड जिल्ह्यांतून वाळूउपशाचे हप्ते कोणाला जातात? याच पैशांवर त्यांचे कार्यकर्ते संगमनेर तालुक्यात दहशत निर्माण करतात, असा खळबळजनक आरोप आमदार राधाकृष्ण विखे पाटील केला.
समन्वय समितीच्या बैठकीपूर्वी माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. त्यानंतर या बैठकीतदेखील त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता निळवंडेच्या प्रश्नावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठविली. या बैठकीस प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जलसंपदा विभागाचे अभियंता गणेश नान्नोर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, राहाता नगरपरिषदेचे चंद्रकांत चव्हाण, निळवंडे प्रकल्पाचे कैलास ठाकरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात आदी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, की वरच्या भागात निळवंडे धरणाच्या पाण्यावर उपसा जलसिंचन योजनांना मंजुरी देऊन खालच्या भागाचे पाणी तिकडे वळविण्याचा घाट घातला जात आहे. निळवंडे कृतिसमिती मात्र गप्प आहे. निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांवर १७ उपसासिंचन योजनांचे सर्वेक्षण करून, त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पाणी द्यायला विरोध नाही. मात्र, त्यातून नेमके कुणाचे पाणी कमी होईल, याचा खुलासा व्हावा. पाणी खाली येण्यापूर्वीच पळवापळवी सुरू झाली आहे. इकडच्या शेतकऱ्यांची माथी भडकवायची आणि पाणी तिकडे पळवायचे, असे चालले आहे. तसे झाले तर खालच्या लाभक्षेत्रात कपात होण्याची शक्यता आहे.
पीकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक, बियाण्यांचा काळाबाजार आणि रासायनिक खतांच्या कृत्रिम टंचाईकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. राहाता तालुक्यात नियोजनबद्ध पाणीयोजना उभारण्यात आल्याने तालुका टँकरमुक्त झाला. आठ वर्षांच्या कार्यकाळात जगभरात भारताची प्रतिमा उंचावून गरिबांसाठी विशेष कार्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला.
-राधाकृष्ण विखे पाटील, आमदार
Tags :
99673
10