अहमदनगर जिल्हा बँकच्या इमारतीला आग: अग्निशमन दल दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर - शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अहमदनगर जिल्हा बँकच्या इमारतीला आग लागली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जिल्हा बॅंकेच्या चौथ्या मजल्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे.
आगीमध्ये जिल्हा बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान ! नक्की काय घडल ? जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच काय झाल ? सविस्तर.
आग विझवण्याचे काम अग्निशामक दल करत आहे. माञ ही आग कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही
दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या तिसर्या मजल्यावर लेखापरीक्षण विभाग आहे. याच लेखापरीक्षण विभागाला आज सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमाराला अचानक आग लागली.
कर्मचार्यांनी याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. मनपाच्या अग्निशमन दल तात्काळ दाखल झाले. त्यानंतर एमआयडीसीचे अग्निशमन दलही दाखल झाले.
सुमारे एक ते दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीमध्ये बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लेखापरीक्षण विभागात सर्व वस्तू जळून खाक झालेल्या आहेत.
या मजल्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालय सुद्धा असल्यामुळे त्या ठिकाणी आगीची झळ पोहोचले आहे. मात्र त्या ठिकाणी नुकसान झाले नाही.