खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी योगिता खेडकर, महेश आसवले यांची निवड
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे विद्यार्थी कु.योगिता खेडकर व महेश आसवले यांची दि. २३ एप्रिल ते २ मे या कालावधीत जैन विद्यापीठ, बेंगलोर येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स अंतर्गत वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी कु. योगिता खेडकर हिची ८१ किलो वजन गटात तर महेश आसवले याची ६७ किलो वजन गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
महेश आसवले याने भुवनेश्वर येथे झालेल्या प्रथम खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते.
त्यांना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख व प्रा. सचिन शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी अभिनंदन केले.