महाराष्ट्र
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 15 महिला आमदार; पुढच्या टप्प्यात कुणाला मिळणार संधी?
By Admin
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 15 महिला आमदार; पुढच्या टप्प्यात कुणाला मिळणार संधी?
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा अखेर आज विस्तार झाला. यामध्ये भाजपच्या 9 आमदारांना तर शिंदे गटातील 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली.
परंतू यात एकाही महिला आमदाराला प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. त्यानंतर मंत्रिमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारमध्ये पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना संधी दिली जाणार असल्याचं सत्ताधाऱ्याकडून सांगितले जात आहे. भाजपकडे एकूण 12 महिला आमदार आहेत. तर शिंदे गटाकडे 3 महिला आमदार आहेत. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात देवयानी फरांदे आणि मनिषा चौधरी यांना संधी मिळेल असं बोललं जात होतं मात्र आज एकाही महिला आमदारांना मंत्रिमंडळात संधी दिली नसल्याने हे सरकार महिला विरोधी असल्याची टीका विरोधी पक्षाकडून केली जात आहे.
भाजपमध्ये मंदा म्हात्रे (बेलापूर), मनिषा चौधरी (दहिसर), विद्या ठाकूर (गोरेगाव), भारती लव्हेकर (वर्सोवा), माधुरी मिसाळ (पर्वती), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), श्वेता महाले (चिखली), मेघना बोर्डीकर (जिंतूर), नमिता मुंदडा (केज), मोनिका राजळे (शेवगाव), मुक्ता टिळक (कसबा पेठ) या 12 महिला आमदार आहेत. तर शिंदे गटात यामिनी जाधव (भायखळा), गीता जैन-भाजप बंडखोर(मीरा-भाईदर), मंजुळा गावित (साक्री) या 3 महिला आमदार आहेत. या महिला आमदारांमध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे आहे.
महिला मंत्री नाही हा जो आक्षेप आहे तो लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल. त्यांनीही महाविकास आघाडीचा पहिला विस्तार केला तेव्हा 5 मंत्र्यानी शपथ घेतली, त्यात कुठलीही महिला मंत्री नव्हती. त्यांना असं बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री द्रेवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या टिकेवर प्रत्युत्तर दिलं आहे.
Tags :
8881
10