महाराष्ट्र
पाथर्डी- गुन्हेगाराकडून अकरा लाखांचे चोरीचे दागिने हस्तगत ; गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
By Admin
पाथर्डी- गुन्हेगाराकडून अकरा लाखांचे चोरीचे दागिने हस्तगत ; गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
नगर,पाथर्डी याठिकाणी भरदिवसा बंदघर पाहून घरफोडी करणारा सराईत गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस जेरबंद करण्यात गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.
स्वरुप उर्फ गुंडया डिस्चार्ज काळे (वय २५ वर्ष रा. अंतापूर शिवार, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.
अहमदनगर: जिल्ह्यातील नगर,पाथर्डी (Ahmednagar Crime)याठिकाणी भरदिवसा बंद घर पाहून घरफोडी करणारा सराईत गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस जेरबंद करण्यात गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. स्वरुप उर्फ गुंडया डिस्चार्ज काळे (वय २५ वर्ष रा. अंतापूर शिवार, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी कल्पना विलास साठे (वय ४८ रा. नारायणडोह ता. नगर) यांनी आपल्या घरी झालेल्या घरफोडी बाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन आरोपी नगरच्या दिशेने घरफोडीतील दागिने विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. नगर-औरंगाबाद रोडवर जेऊर टोलनाक्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने मोटारसायकलवर आलेल्या दोन संशयितांना हटकले असता एक संशयित पोलिसांना पाहून पळून गेला तर दुसऱ्या संशयिताला ताब्यात
घेतल्यानंतर त्याच्या कदे आकरा लाख वीस हजार रुपये किमतीचे २१ तोळे (२१० ग्रॅम) वजनाचे सोन्याचे घरफोडीतले दागिने सापडून आले. अटक केलेल्या स्वरुप उर्फ गुड्या डिस्चार्ज काळे याचेविरुध्द औरंगाबाद व अहमदनगर जिल्हयात दरोडयाचे गंभीर स्वरुपाचे ०६ गुन्हे दाखल आहेत.
मनोज पाटील साो. पोलीस अधीक्षक, अहदमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. सपोनि गणेश इंगळे, सपोनि दिनकर मुंडे, पोसई सोपान गोरे, सफी मनोहर शेजवळ, पोहेकॉ. सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे. मनोज गोसावी, बापुसाहेब फोलाणे, पोना शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, संदीप चव्हाण, दिलीप शिंदे. संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, भिमराज खसे, राहुल सोळंके, संतोष लोढे, लक्ष्मण खोकले, पोकां मेघराज कोल्हे. योगेश सातपुते, जालिंदर माने चापोहेकॉ संभाजी कोतकर, उमाकांत गावडे यांनी तपाकामी काम पाहिले.
Tags :
1132
10