पाथर्डी- ट्रकची धडक बसून तरुण जागीच ठार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
भरधाव ट्रकने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने, त्यावरील तरूण जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी (दि.25) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास चाँदबिबी महालाजवळ घडली.
सुभाष बाबासाहेब अकोलकर (वय 45, रा. करंजी, ता. पाथर्डी) असे अपघातातील मृताचे नवा आहे. प्रगतशील शेतकरी असलेले अकोलकर हे नेहमीप्रमाणे करंजीहून म्हशींचे दूध घेऊन मोटारसायकलवरून नगरकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या मोटरसायकलला समोरून येणार्या एका ट्रकने (एम एच 16 – 1966) जोराची धडक दिली. या अपघातात अकोलकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक तेथून पसार झाला.
अपघाताची माहिती समजताच माजी सरपंच प्रकाश पालवे, मेहेकरीचे उपसरपंच शरद बडे, सामाजिक कार्यकर्ते सुधीर वायकर, राहुल कर्पे यांनी अकोलकर यांना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. अकोलकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. एका शेतकरी कुटुंबातील या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने करंजीसह परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.