पाथर्डी- नवीन औरंगाबाद-पुणे एक्सप्रेसवे नेवासे - पाथर्डी - नगर तालुक्यांतून जाणार; शेतकऱ्यांची होणार चांदी
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
औरंगाबाद एक्सप्रेसवे मुळे नगर महामार्गाच्या मुख्य ट्रकवर येणार असून, हा नवा एक्सप्रेसवे नगर जिल्ह्यातील नगर, नेवासे व पाथर्डी या तालुक्यांतून १२३ किलोमीटर
जाणार आहे. "एक्सप्रेस'वे च्या भूसंपादनासाठी नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले अाहे. पुढच्या पंधरा दिवसांत लोकप्रतिनिधींची
बैठक घेतली होणार आहे.पुणे -नगर -औरंगाबाद असा नवा एक्सप्रेसवे तयार होणार अाहे. २६० किलोमीटरचा हा नवा एक्सप्रेस राहणार आहे. यात नगर जिल्ह्यात १२३ किलोमीटरचा हा एक्सप्रेसवे राहणार आहे.
नगर जिल्ह्यातील नेवासे, नगर, पाथर्डी या तीन तालुक्यांचा समावेश राहील. नगर -औरंगाबाद या सध्याच्या रस्त्यापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरुन हा नवा एक्सप्रेस वे जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर येथून या एक्सप्रेसवेला सुरुवात होणार आहे. या एक्सप्रेसवेसाठी पुणे जिल्ह्यातील भूसंपादनासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली अाहे. लोकप्रतिनिधींची बैठक
देखील झाली आहे. जिल्ह्यातील एक्सप्रेसवेसाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. दरम्यान, औरंगाबाद- पुणे या नवीन एक्सप्रेसवेसाठी लोकप्रतिनिधींची बैठक बोलावू, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यातील भूसंपादनाबाबत चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने पत्र दिले आहे. पुढच्या पंधरा दिवसात
लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे."मिलिंद वाबळे, वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.