धारदार शस्ञाने डोक्यावर वार करत आईचा खून
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पत्नीसोबत सुरु असलेले भांडण सोडविण्यास आलेल्या आईच्या डोक्यात खोरे मारून मुलाने खून केल्याची घटना अकोले शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, (दि 11) रोजी सायंकाळी 7:30 वा. च्या सुमारास सुभाष रोड येथील घरासमोर फिर्यादी संतोष किसन पवार याचा भाऊ विनोद किसन पवार दारू पिऊन पत्नी पूजा हिच्याशी मुलाला औषध पाजण्याच्या कारणावरून भांडण करीत होता.
यावेळी फिर्यादी संतोष व आई मृत पमाबाई पवार भांडण सोडविण्यात गेली असता, तिला मुलगा विनोद याने शिवीगाळ व दमदाटी करीत होता. यावेळी संतोष भांडण सोडवित असताना विनोद याने अचानक खोरे उचलून आईच्या डोक्यात मारून तिला गंभीर दुखापत करून, ठार मारले. तेच खोरे फिर्यादी संतोषच्या डोक्यात मारून दुखापत केल्याची फिर्याद अकोले पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. गु.र.नं.373/2022 नुसार भादंवी कलमांद्वारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन, त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ऐन रक्षाबंधन या पवित्र सणाच्या दिवशी जन्मदात्या आईचा काळ ठरणार्या मुलाच्या कृतीबद्दल संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे हे करीत आहेत.
मुलगाच ठरला वैरी!
मुलानेच आईचा खून केल्याची घटना शहरात घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जन्मदात्या आईचा वैरी होत मुलाने निर्घृणपणे हत्या केल्याने संताप व्यक्त होत आहे.