महाराष्ट्र
तलाठ्याला मारहाण;तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin
तलाठ्याला मारहाण;तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे आपत्ती व्यवस्थापनाचे काम करत असताना कामगार तलाठी गोरखनाथ भगवान दराडे (वय 45 वर्षे) यांना काही लोकांनी मारहाण केल्याची घटना सोमवार दि.17 रोजी दुपारी घडली.
तलाठी गोरखनाथ भगवान दराडे (वय 45 वर्षे) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की,
मी जेऊर हैबती ता नेवासा येथे कामगार तलाठी म्हणून काम
पाहतो.सध्या मोठया प्रमाणात पाऊस चालू असून जेऊर हैबती गावाच्या शिवारामधे बरेच ठिकाणी पाणी साचलेले आहे. सदरच्या पाण्यामुळे मोठया प्रमाणात पिकाचे नुकसान तसेच लोकांचे राहते घराचे नुकसान झालेले आहेत. जेऊर ते देवगाव जाणारे रोडवरील ईटकर वस्तीवरील कडूबाई बापूसाहेब ईटकर, विठलं पिराजी ईटकर व इतर यांचे राहते घरामधे पावसाचे पाणी साधुन घराचे नुकसान झाल्याने त्यानी ग्रामपंचायत कार्यालय जेऊर हैबती व आमचे तलाठी कार्यालय येथे तक्रारी अर्ज केल्याने तसेच तहसिलदार नेवासा यांनी त्याचे मोबाईल वरून तोंडी सूचना तसेच लेखी स्वरुपात सदरचे पावसाचे पाणी बाहेर काढणे बाबत जा.क्र. 729/2022 दिनांक 07/10/2022 अन्वये पथक प्रमुख म्हणून माझी नेमणूक करून मला लेखी सूचना दिल्या. सोबत ग्रामसेवक राजाराम नामदेव काटे जेऊर हैबती, कृषी सहायक विजय विठ्ठल बडे यांची टिम मदतीस नेमली आहे. तसेच गावामधील सरपंच महेश आण्णासाहेब
म्हस्के, ग्रामपंचायत लिपीक दिपक सुभाष वारे व आमची टीम असे आम्ही ईटकर वस्ती येथे जावून गट ने 373 व 375 मधील घरांची पाहणी केली असता सदर वस्तीमधील घरामधे पावसाचे पाणी जाऊन नुकसान झालेले व पाणी साचलेले दिसले. त्यावेळी आमचे पथकाने पाहणी केली असता रोडच्या डाव्या बाजूला असलेल्या शेतकरी सुरेश जावळे याने त्याचे शेताच्या व रोडच्या लगत असलेला चर हा माती टाकुन पुर्णपणे बंद केलेचे आमचे निदर्शनास आले. त्यामुळे पावसाचे पाणी ओढयाकडे जाण्यास अडथळा निर्माण झाला होता, सदरची बाब मी तहसीलदार नेवासा यांना फोनदवारे कळवली. त्यावर तहसीलदार यांच्या आदेशाने सदरचे साचलेले पाणी चर खांदून रोडच्या डाव्या बाजुने सुरेश जावळे यांच्या शेतीच्या व रोडच्या कडेने पाणी काढून देण्याचे काम जे.सी.बी.चे साहयाने दिनांक 17/10/2022 रोजी दुपारी 12:00 वाजेचे सुमारास चालू केले होते.
त्यावेळी दिनांक 17/10/2022 रोजी दुपारी 01:30 वाजेचे सुमारास जेऊर हैबती ते देवगाव जाणा-या रोडच्या डाव्या बाजुचा लगतचा शेतकरी नामे सुरेश मच्छीन्द्र जावळे, भारत आण्णासाहेब जावळे, आण्णासाहेब नामदेव जावळे रा.जेऊर हैबती हे आले व त्यानी आमचे शेताच्या लगत चर खोदत असताना अचानक त्याठिकाणी येऊन जोर जोरात शिवीगाळ करून माझे अंगावर धावून आला सुरेश मश्चीन्द्र जावळे याने मला लाथाबुक्यानी मारहाण केली व त्याचा सोबत असणारे भारत आण्णासाहेब जावळे आणि आण्णासाहेब नामदेव जावळे हे त्याला मारहाण करण्यासाठी प्रोस्ताहन करीत होते. माझा शर्टची कॉलर पकडुन शर्ट फाडला व बनीयन ही फाडले तसेच मला खोदलेल्या चरात लोटून दिले. त्यावेळेस माझा वरचा खीशात असलेले माजी सैनीक असलेले ओळखपत्र, एटीएम कार्ड, मतदान कार्ड, ड्रायविंग कार्ड, फोर व्हिलरचे आरसी बुक असे कागदपत्र हे पाण्याच्या चरामधे पडले. त्याचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत. त्यावेळी माझे सोबतच पथकातील इतर कर्मचारी व ग्रामपंचायतचे पदाधीकारी सरपंच व ईतर ग्रामस्थ गोरक्षनाथ कडू कानडे यांनी त्यास वरून बाजूला केले तरी पण देखील तो काणाचेही काहीच ऐकत
नव्हता. त्याने ग्रामपंचायत लिपीक दिपक सुभाष गवरे हा त्याच्या मोबाईल मधे भांडणाचे चित्रीकरण करीत असतांना त्याचा मोबाईल हिसकावून घेवून पाण्यात टाकुन त्याचे नुकसान केले आहे. व त्यास देखील त्याचा हात मुरगाळून त्यास धक्काबुकी केली आहे. त्यावेळी त्या ठिकाणी जमलेल्या लोकानी त्यास धरले व बाजूस केले.
तरी दि. 17/10/2022 रोजी दुपारी 01:30 वा चे सुमारास जेऊर हैबती शिवारातील जेऊर हैबती ते देवगाव जाणारे रोडच्या उजव्या बाजूस असलेला ईटकर वस्ती वरील घरामधे साचलेले पाणी जेसीबीच्या साह्याने चर खोदून काढून देत असतांना आम्ही करत असलेल्या शासकिय कामकाजात आढळा निर्माण करून ईसम नामे सुरेश मच्छिंद्र जावळे, भारत आण्णासाहेब जावळे, आण्णासाहेब नानदेव जावळे सर्व रा.जेऊर हैबती ता.नेवासा यांनी जाणीवपूर्वक मला लाथाबुक्यांनी मारहाण करून मला दुखापत केली आहे. माझा शर्ट व बनीयन फाडला व ग्रामपंचायत लिपीक दिपक गवारे यास त्याचा हाथ मुरगाळून मोबाईल पाण्यात फेकुन देऊन नुकसान केले आहेत. व आम्हांस शिवीगाळ व दमदाटी केली आहे.
या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,पोलीस निरीक्षक विजय करे,तलाठी संघटनेचे विभागीय अध्यक्ष सोपानराव गायकवाड, नेवासा तालुकाध्यक्ष बद्रीनाथ कमानदार , तालुक्यातील सर्व तलाठी पोलिस ठाण्यात उपस्थित होते.
Tags :
974
10