पाथर्डी- आरती केदार महिला रणजी महाराष्ट्र संघात निवड
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील हात्राळ येथील रहिवासी आणि एम. एम. नि-हाळी व बाबूजी आव्हाड महाविद्यालयाची विद्यार्थिनी तसेच एस.व्ही. नेट अकॅडमीची महिला क्रिकेटर आरती केदार हिची महिला रणजी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) मार्फत २०२२-२३ मध्ये होणाऱ्या महिला टी-२० स्पर्धैसाठी महाराष्ट्र राज्याचा (रणजी) महिला सिनिअर संघ नुकताच जाहीर झाला. या संघा मध्ये एस. व्ही. नेट क्रिकेट अकॅडमीची आरती केदार हिची पुन्हा एकदा निवड झाली आहे.
गेल्या वर्षी २०२१-२२ मध्ये आरती केदार हिने १५ विकेट्स घेऊन संपूर्ण भारतात आव्वल स्थानी होती. त्यामुळे २०२२ मध्ये आय. पी. एल. साठीही तीची निवड झाली होती.
पाथर्डी तालूक्यासह संपूर्ण अहमदनगर जिल्हातुन तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गेल्या ९ वर्षापासुन एकलव्य शिक्षण संस्थेचे सचिव प्रतापराव ढाकणे यांच्या अनमोल सहकार्याने चालणाऱ्या एस. व्ही. नेट क्रिकेट अकॅडमीमध्ये आरती केदार ही प्रशिक्षक शशिकांत निऱ्हाळी यांच्या कडुन क्रिकेटचे धडे घेत आहे. लवकरच आरती केदार भारतीय संघात दिसेल, असे तिचे प्रशिक्षक सांगतात.
आरतीस एकलव्य शिक्षण संस्थेचे सचिव प्रतापराव ढाकणे, जि. परिषद सदस्या सौ.प्रभावती ढाकणे तसेच अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आरुणकाका जगताप यांनी पुढील कारकीर्दीसाठी अनंत शुभेच्छा दिल्या.