महाराष्ट्र
Breaking- 'या' तालुक्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटला
By Admin
Breaking- 'या' तालुक्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यात १२वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. आज गणित या विषयाचा पेपर होता. परंतू हा पेपर फुटला आणि 10 वाजताच उत्तर पत्रकेसह सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या सर्वत्र बारावीचे पेपर सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर अहमदनगरमधून मोठी बातमी आली आहे. (Twelfth paper leaked in Ahmednagar)
नगर जिल्ह्यात बारावी बोर्डाचा गणित विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
मागील दोन वर्ष कोरोनाच्या सावटाखाली ऑनलाईन पेपर झाले.
परंतु यंदा ऑनलाईन पेपर सुरु आहेत. यंदा पेपर ऑनलाईन घ्यावे की ऑफलाईन घ्यावे यासाठी बराच काळ वाद-विवाद झाले.
दरम्यान त्यानंतर पेपर ऑफलाईन घेण्याचा निर्णय झाला. यासाठी विविध काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
त्यानुसार कोव्हिडच्या सर्व नियमांचे पालन करून पेपर घेण्यात आले. सर्वत्र सध्या बाराची पेपर सुरु आहेत.
परंतु आज गणिताचा पेपर होता. परंतु श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी सुमारे पाऊण तास उत्तरासहित प्रश्नपत्रिका यांच्या मोबाईलच्या व्हाट्सअप वर आल्याने एकच खळबळ उडाली. नगर जिल्ह्यात बारावी बोर्डाचा गणित विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक बातमी समोर आल्याने आता पुढे काय निर्णय होणार?
कोणावर कारवाई होणार? पेपर पुन्हा होणार का? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत.
पेपर अहमदनगर जिल्ह्यात नक्की कोणत्या केंद्रातून फुटला याबाबत तपास करण्यासाठी शिक्षणाधिकारी श्रीगोंदयात दाखल झाले आहेत.
बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला; खासगी क्लासच्या शिक्षकाला अटक
बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी घेण्यात आलेल्या केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचं उघड झालंय. या प्रकरणी मालाडच्या खासगी क्लासेसच्या प्रोफेसर मुकेश यादवला अटक करण्यात आली आहे.
शालेय शिक्षणमंत्री म्हणतात, तो पेपर फुटलाच नाही
विलेपार्ले येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर रसायनशास्त्रचा (केमिस्ट्री) पेपर फुटल्याची घटना घडली. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. याबाबत गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरु आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली.
विद्यार्थ्यांना १० मिनिटे आधी प्रश्नपत्रिका वाटली जाते. त्यानुसार रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका १०.२० वाजता वितरित करण्यात आली. मात्र, एका विद्यार्थिनीला येण्यास उशीर झाला होता. तिचा फोन चेक केला असता प्रश्नपत्रिकेचा काही भाग मोबाईलमध्ये १०.२४ वाजता आढळून आला.
बारावी रसायनशास्त्रचा हा संपूर्ण पेपर फुटला नाही. त्यातील काही भाग त्या विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये आढळून आला. त्या विद्यार्थिनीच्या चॅटनुसार या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. हा मुद्दा विधान परिषदेत विरोधी पक्षाकडून विचारण्यात आला होता.
कॉपी बहाद्दरांना शिक्षण मंडळाचा दणका
कॉपी बहाद्दरांना शिक्षण मंडळाने दणका दिला आहे. सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेत आतापर्यंत 41 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉपी बहाद्दर सापडल्याने शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना नापास करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी कॉपी करणा-या तीन विद्यार्थ्यांना अटकही करण्यात आलीय.
Tags :
93646
10