महाराष्ट्र
सामान्य लोकांच्या कामासाठी अधिकार्यांवर माझा दबाव नक्कीच, सुजय विखेंच्या टीकेला रोहित पवाराचं प्रत्युत्तर
By Admin
सामान्य लोकांच्या कामासाठी अधिकार्यांवर माझा दबाव नक्कीच, सुजय विखेंच्या टीकेला रोहित पवाराचं प्रत्युत्तर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कर्जत जामखेडमधील अधिकार्यांवर माझा दबाव नक्कीच आहे. सामान्य लोकांची कामं करत असताना अधिकाऱ्यांवर माझा दबाव असतोच असे वक्तव्य कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.
आमदार जर लोकांच्या हितासाठी खोलात जाऊन काम करत असेल, तर को-ऑर्डिनेशनचं काम करण्यासाठी मला जास्त पीए लागतीलच असेही रोहित पवार म्हणाले. भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी रोहित पावर यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सुजय विखे पाटील यांनी विविध मुद्यावरुन रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. कर्जत जामखेड तालुक्यात एक नाही तर 10 आमदार आहेत. कारण आमदारांच्या पीए ची संख्याच तेवढी आहे, असं म्हणत सुजय विखेंनी रोहित पवारांना टोला लगावला होता. त्यांच्या या टिकेला रोहित पवार पवारांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. मुळात ते पीए नाहीत तर कॉर्डिनेटर आहेत. कदाचित सुजय विखे यांना हेच सांगायचं होतं की, त्याठिकाणी अतिशय चांगला काम सुरु आहे. कामं योग्य पद्धतीने होत आहेत की नाहीत ते पाहण्यासाठी माझे अनेक कॉर्डिनेटर त्या ठिकाणी कार्यरत असल्याचे रोहित पवार म्हणाले.
सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले होते?
कर्जत-जामखेड तालुक्यातील एक तरी सरकारी अधिकारी हसताना दिसतो का? त्यांच्या चेहऱ्यावर कायमच गांभीर्य असते. तालुक्यात एक नाही तर दहा आमदार आहेत, कारण आमदारांना पीए च तेवढे आहेत असा टोला खासदार सुजय विखेंनी आमदार रोहित पवारांना लगावला होता. कर्जत तालुक्यातील शिरपूर येथे सभामांडपाचे उद्घाटन सुजय विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार विखे बोलत होते. त्यांच्या या टीकेनंतर रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
धार्मिक स्थळावरील अनुभव प्रेरणादायी
कुठल्याही धार्मिक स्थळावर गेल्यानंतर येणारा अनुभव प्रेरणादायी असतो. अयोध्येसह अजमेर, वाराणसी, पुष्कर, आणि सारनाथलाही जाऊन आलो. मन प्रसन्न झालं असल्याचे रोहित पवार यावेळी म्हणाले. हा एक कौटुंबिक दौरा होता. जसे तुम्ही कुटुंबासह मंदिरात जातात तसेच मी पण कुटुंबासह गेलो होतो असेही रोहित पवार म्हणाले.
Tags :
38151
10