जातनिहाय जनगणना करा. अकुंश बोके
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष अकुंश बोके यांनी तहसिलदार यांना प्रमुख मागण्याचे निवेदन दिले आहे. जातनिहाय जनगणना करणे,ओबीसी आरक्षण कायम करणे, नॉन क्रिमिलिअर ची अट रद्द करणे, 50 % सिलींग हटविणे, सार्वजनिक संस्थामध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे, न्याय व्यवस्था , केंद्रीय सार्वजनिक शैक्षणिक संस्थामध्ये संपुर्ण आरक्षण लागू करणे, धान्यमालाला हमीभावाने खरेदीची हमी देणे, महागाई थांबविण्यासाठी ठोस पाऊले उचलणे
संपुर्ण शिक्षण मोफत करणे, मोफत आरोग्य सुविधा पुरविणे अशा विविध मागण्याचे निवेदन नायब तहसिलदार गुजांळ यांना देण्यात आले आहे.वरील मागण्या मान्य करण्याबाबत शासनाकडे शिफारस करण्यात यावी असे मत यावेळी अकुंश बोके यांनी व्यक्त केले. या पञावर संघटनेचे सदस्य योगेश लोखंडे, अतुल कटारनवरे, विठ्ठल साबळे, अर्जुन नजन, प्रविण निचळ, आदिनाथ जाधव, आबासाहेब निचळ,अशोक तांबे,रविंद्र साबळे यांच्या सह्या आहेत.
तसेच दि . 5 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने राष्ट्रीय अध्यक्ष मा.महादेवजी जानकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश पातळीवरील ओ.बी.सी. समाज एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहे.असेही यावेळी बोके यांनी सांगितले.