महाराष्ट्र
श्री तिलोक जैन विद्यालयात बी.आय. एस.क्लबची स्थापना
By Admin
श्री तिलोक जैन विद्यालयात बी.आय. एस.क्लबची स्थापना
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयात बुधवार दि.२९ जून रोजी बी.आय. एस. ( BIS ) क्लबची स्थापना करण्यात आल्याची माहिती प्राचार्य अशोक दौंड यांनी दिली.
'भारत की आजादी का अमृत महोत्सव' निमित्त केंद्र सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्या अंतर्गत भारतातील प्रत्येक राज्यात हा उपक्रम माध्यमिक शाळा,महाविद्यालय तसेच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये राबविला जाणार आहे.
'आजादी का अमृत महोत्सव' उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात भारताच्या पंतप्रधानांनी १२ मार्च २०२१ रोजी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातून केली तर त्याची सांगता १५ ऑगस्ट २०२३ रोजी केली जाईल. भारतीय मानांक संस्था क्लब ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी २ वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. सदर क्लब अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून प्रत्येक उपक्रमासाठी बी आय एस कडून प्रत्येकी दहा हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. या स्टॅण्डर्ड क्लब च्या उपक्रमासाठी विद्यालयातील उपक्रमशील विज्ञान शिक्षक सुनिल कटारिया यांची नियुक्ती झाली असून त्यांनी सदर क्लब च्या कार्यवाही बाबत दि .६ व ७ मे रोजी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण 'यशदा' बाणेर येथे पूर्ण केले. शिवाय तालुक्यात बी आय एस क्लब स्थापन करणारे श्री तिलोक जैन विद्यालय हे प्रथम विद्यालय आहे.
या वेळी कटारिया म्हणाले की, बी आय एस हे भारतातील सर्व उत्पादकांच्या उत्पादनांना आयएसआय मार्क सर्टिफिकेशन देते. तसेच भारतीय उत्पादनांचे मानांकन ठरवते. त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल लायसन्स अँप्रोव्हड करते. बी आय एस क्लब स्थापनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना विद्यालयीन वयातच स्टैंडर्डस किंवा मानांकनाचे महत्व कळावे तसेच मेक इन इंडिया अंतर्गत सर्व प्रकारच्या कच्चा व पक्या मालाचे उत्पादन भारतातच व्हावे हा आहे.याचप्रमाणे बाजारातील आय एस ओ किंवा आय . एस . आय . (ISI )मार्क हॉलमार्किंग उत्पादने खरेदी करतो,त्यामध्ये ग्राहक म्हणून भारतीय नागरिकांची फसवणूक होऊ नये, असे विचार त्यांनी व्यक्त केले. या प्रसंगी पर्यवेक्षक विजयकुमार घोडके यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बी.आय.एस. (BIS)ॲप कसे वापरायचे तसेच मानांकन कसे बनवायचे खरेदी केलेल्या वस्तू ISI मार्किंग ,हॉलमार्किंग च्या आहेत की नाही, हे ओळखण्याचे प्रशिक्षण मेटाँर सुनिल कटारिया यांनी दिले.
सदर स्टॅण्डर्ड क्लब च्या उद्घाटन प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड , उपप्राचार्य विजयकुमार छाजेड , पर्यवेक्षक दिलावर फकीर , विजयकुमार घोडके , सुधाकर सातपुते , बी . आय . एस . चे मेंटॉर सुनिल कटारिया , को - मेंटॉर श्रीमती संध्या पालवे , विद्यालयातील नववी ते बारावीचे क्लब चे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल कटारिया यांनी केले तर आभार श्रीमती संध्या पालवे यांनी मानले.
Tags :
8359
10