महाराष्ट्र
विहीरीत सापडला अनोळखी पुरुषाचा मृतदेह
By Admin
विहीरीत सापडला अनोळखी पुरुषाचा मृतदेह
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे घडली घटना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
तालुक्यातील वडझिरे शिवारामधे देवीभोयरे फाट्यावर मा. सरपंच भागाजी भाऊ निघुट यांचे शेतजमीनीमधील विहीरी मधील पाण्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याची खबर शिवाधार सोखीदलाल चौधरी वय वर्ष ३७ सध्या राहणार क्रांतीशुगर साखर कारखाना, ता. पारनेर, (मुळगांव नयागांव, मध्यप्रदेश) यांनी दि. २६ जुलै २०२२ रोजी दुपारी ४ वाजता खबर दिली.
यापूर्वी मृताचे मामा शिवाधार सोखीलाल चौधरी यांनी त्यांचा भाचा रामजी जोधाप्रसाद चौधरी राहणार क्रांतीशुगर साखर कारखाना देवीभोयरे, (ता. पारनेर जि. अहमदनगर) हा दि. २१ जुलै रोजी रात्री १० वाजता जेवण झाल्यावर झोपायला गेलो त्यानंतर दि. २२ जुलै रोजी सकाळी झोपेतून उठल्यावर पाहिले तर, शैजारी झोपलेला भाचा रामजी जोधाप्रसाद चौधरी वय २२ हा दिसूत नसून सोबतच्या लोकांकडे चौकशी केली. आजुबाजुच्या परीसरामधे शोध घेतला तरीसुध्दा तो मिळून आला नाही. तो गेला तेव्हा त्याचे अंगात सफेद शर्ट व निळ्या रंगाची जिन्सपॅन्ट घातलेली होती. कुणालाही काहीही न सांगता हा घरातुन निघुन गेला होता. त्याचा शोध घेणेकामी पारनेस पोलीस स्टेशनमधे ठाणे अंमलदार गायकवाड यांचेकडे तशी मिसींग दाखल केली होती.
त्यानंतर वडझिरे शिवारातील देवीभोयरे फाट्यावर भागाजी निघुट यांचे विहीरीमधे त्याचा मृतदेह आढळुन आला. घटनेची खबर पारनेर पोलीसस्टेशनला कळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबा भोसले यांनी घटनास्थळावर दाखल होत. नागरिकांचे
मदतीने मृतदेह विहीरीमधून पाण्या बाहेर काढला व पंचनामा केला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामिण रुग्णालय पारनेर येथे केले. मयत व्यक्ती हा हा आमचा भाचा मुळचा सतना, मध्यप्रदेश सध्या राहणार क्रांतिशुगर साखर कारखाना (ता. पारनेर, जि.अ. नगर) हाच असल्याचे मिसींग दाखल करणाऱ्या मामाने सांगीतले.
मृतदेहाची ओळख पटल्यावर पारनेर पोलीस स्टेशनला सदर व्यक्तीचा पाण्यात बुडुन तो मयत झाला. यावरुन आकस्मात मृत्युची नोंद मृत्यु रजि. नंबर ८७ / २०२२ सी.आर.पी.सी. कलम १७४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा भोसले हे करत आहेत.
Tags :
49434
10