ढोरेगांव- नगर-औरंगाबाद महामार्गावर ट्रंक चालकाला चाकूने भोसकले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
औरंगाबाद अहमदनगर महामार्गावरील ढोरेगांव हद्दीतील राधीका पेट्रोल पंपा जवळ आयशर चालकाला चाकूने भोसकले ही घटना आषाढी एकादशीच्या दिवशी रात्री अकरा वाजता घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विलास नारायण पवार (३६) हल्ली राहणार सह्याद्री अपार्टमेंट बजाज नगर मुळ गाव चिंचोली तालुका कन्नड आयशर क्रमांक एम एच २० सि टी १६६५ घेऊन पुण्याहून औरंगाबादकडे १० जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी रात्री अकरा वाजता येत असताना अज्ञात आरोपींनी ढोरेगांव हद्दीतील राधीका पेट्रोल पंपा जवळ आयशर अडवुन पवार याला खाली उतरून धारदार शस्त्राने पोटावर सपासप वार करून ठार केले या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, सपोनी साईनाथ गिते, पोहे का बलविर बहुरे, योगेश हारणे, कैलास निंभोरकर आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा खुन कोणत्या कारणासाठी करण्यात आला की लुटमार झाली याचा पोलीस शोध घेत आहेत.