पाथर्डी- मिडसांगवी येथे विहिरीत पडून मुलाचा मृत्यू
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे एका १४ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली.चैतन्य ज्ञानेश्र्वर देवकाते असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.या घटनेने पारिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
चैतन्य हा शेतामधील विहिरीकडे गेला होता.यावेळी त्याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला.ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. सुमारे सहा तासानंतर या मुलाचा मृतदेह विहिरीत सापडला.