महाराष्ट्र
अडवणूक करणाऱ्या सत्ताधारी, शासकीय अधिकार्यांना त्यांची जाणीव करून द्या - प्रा. किसन चव्हाण
By Admin
अडवणूक करणाऱ्या सत्ताधारी, शासकीय अधिकार्यांना त्यांची जाणीव करून द्या - प्रा. किसन चव्हाण
दुलेचांदगाव येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन व घोंगडी बैठक
पाथर्डी- प्रतिनिधी
आपल्या विभागातील साखर कारखानदारांनी स्वतःच्या कारखान्याचा ,शिक्षण संस्थाचा विस्तार करण्यापलीकडे वर्षानुवर्षे तीन तीन पिढ्या सत्ता आपल्या घरात असतांना सर्वसामान्य गोरगरिबांच्या हाताला रोजगार मिळावा, ते स्वावलंबी व्हावे, यासाठी काहीही केले नाही. कारखाने, शिक्षण संस्था सांभाळण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागत असल्याने मतदारसंघातील जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणुस मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे आपल्या भागात कारखानदार सोडून आमदार झाला तरच शेवगाव- पाथर्डी चा सर्वांगीण विकास होऊ शकतो, असा शाब्दीक हल्ला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी दुलेचांदगाव येथे संपन्न झालेल्या घोंगडी बैठकीत केला.
सर्वसामान्य जनतेबरोबर सवांद साधून त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी शेवगाव- पाथर्डी तालुक्यात प्रा. किसन चव्हाण यांनी घोंगडी बैठक अभियान सुरू केलेले आहे. या अभियानांतर्गत पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उदघाटन आणि घोंगडी बैठक संपन्न झाली. यावेळी ग्रामस्थांशी सवांद साधतांना प्रा. चव्हाण बोलत होते.
गुरुवार दि. २३ जून रोजी मौजे दुलेचांदगाव ता. पाथर्डी येथे वंचित बहूजन आघाडी शाखा उद्घाटन व प्रा. किसन चव्हाण यांची घोगंडी बैठक संपन्न झाली.
अतिशय मोठ्या उत्साहात स्वाभिमानी ग्रामस्थ व तरुणांनी फटाके, तोफा वाजवून महीला भगीणींनी प्रा. चव्हाण यांचे औक्षण करुन मिरवणुकीसह प्रथम शाखा उद्घाटन केले. त्या नंतर प्रा. किसन चव्हाण यांची घोगंडी बैठक दुलेचांदगावचे विद्यमान सरपंच रणजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या वेळी डॉ. अंकुश गायकवाड,
जिल्हाउपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, शेवगाव तालुकाध्यक्ष शेख प्यारेलालभाई,पाथर्डी तालुकाध्यक्ष रवींद्र उर्फ भोरु म्हस्के, संजय कांबळे,रोहीणीताई ठोंबे,दिलावर बागवान यांची मार्गदर्शन पर भाषणे झाली. या कार्यक्रमास लक्ष्मण मोरे, शेख सलीम जिलानी,दिलावर बागवान, बाबासाहेब चव्हाण, शेख राजूभाई, आशिर्वाद कचरे, पागोरी पिंपळगावचे मुनिर पटेल,रहीम पटेल, महेंद्र राजगुरु,शेळके गुरुजी,गोटू धोत्रे, उपाध्यक्ष फडतुरे, सुनिल जाधव, देवीदास लोखंडे, सोपान भिगांरे,बाळासाहेब शेळके, प्रकाश ठोबें, विलास बांगर, आरीफ शेख, अंबादास थोरात,माणिक खवले,गोरख बांगर, सचिन दिनकर आदी उपस्थित होते. तसेच मौजे दुलेचांदगाव येथील स्वाभिमानी ग्रामस्थ व वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव पाथर्डीच्या महीला भगीणी, वंचित बहुजन आघाड़ीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जे सत्ताधारी अथवा शासकीय अधिकारी अडवणूक करतील, त्यांना त्यांची जाणीव करुन द्या किंवा वंचित बहूजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क करा, असे प्रा. किसन चव्हाण यावेळी म्हणाले.आपले प्रलंबीत प्रश्ना बाबत ग्रामस्थांना आवाहन केले असता आपले प्रलंबीत प्रश्न सोडवण्याकरिता ग्रामस्थ व महीलांची मोठी झुंबड उडाली होती.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन उपाध्यक्ष फडतुरे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार सखाराम कुऱ्हाडे यांनी मानले.
Tags :
46854
10