चितळी सेवा सोसायटीत मच्छिंद्रनाथ शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व
By Admin
चितळी सेवा सोसायटीत मच्छिंद्रनाथ शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व
पाथर्डी -प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे तर व्हाईस चेअरमन पदी अण्णासाहेब आमटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
त्याप्रसंगी पॅनल प्रमुख सुभाष ताठे ,अशोक ताठे, अनिल ढमाळ, संचालक अनिल कदम, प्रवीण ढमाळ, विलास ढमाळ, शरद ढमाळ, बाळासाहेब आमटे ,भाऊसाहेब पवार ,आशा ताठे, बेबीताई ताठे, नानासाहेब गर्जे, अनिल ढमाळ, कांताराम भालेराव, अशोक आमटे, संदीप आमटे ,अजित ताठे, विष्णू कदम, प्रवीण आमटे , हर्षवर्धन ताठे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चितळी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत मच्छिंद्रनाथ शेतकरी विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवीत १३ पैकी १३ जागेवर विजय मिळवला. निवडणूक निर्णय अधिकारी डी.डी. पारधे यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक निबंधक कार्यालयात चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी बाळासाहेब ताठे तर व्हा. चेअरमन पदासाठी अण्णासाहेब आमटे यांचे एकमेव अर्ज दाखल करण्यात आले.
बाळासाहेब ताठे यांना सूचक प्रवीण ढमाळ तर अनुमोदक वसंत आमटे हे होते, तर अण्णासाहेब आमटे यांना सूचक शरद ढमाळ व अनुमोदक म्हणून भाऊसाहेब पवार होते.
चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे बाळासाहेब ताठे यांची चेअरमनपदी तर अण्णासाहेब आमटे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डी.डी. पारधे यांनी घोषित केले. या निवडीनंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करून फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.
निवडीनंतर सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब ताठे म्हणाले, सभासदांनी आमच्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासास पात्र राहून सर्वांना बरोबर घेऊन सोसायटीचा पारदर्शक कारभार करू. सोसायटी मार्फत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबऊ, असे चेअरमन बाळासाहेब ताठे म्हणाले.