महाराष्ट्र
10720
10
मतदानाचे पवित्र कर्तव्य प्रत्येकाने पार पाडले पाहिजे- तहसीलदार शाम वाडकर
By Admin
मतदानाचे पवित्र कर्तव्य प्रत्येकाने पार पाडले पाहिजे- तहसीलदार शाम वाडकर
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी शहरातील बाबूजी आव्हाड महाविद्यालय येथे पाथर्डीचे तहसीलदार श्याम वाडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे आवाहन करून पुढे बोलतांना तहसीलदार वाडकर यांनी विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आग्रह धरला.
फॉर्म नंबर ६ मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी वापरला जातो, फॉर्म नंबर ७ हा मतदार यादीतील नाव कमी करण्यासाठी वापरला जातो आणि फॉर्म नंबर ८ मतदार यादीतील नावातील दुरुस्ती करण्यासाठी वापरावा. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये निवडणुकीस सामोरा जात आहे . लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. मतदानाचा हक्क आपल्याला संविधानाने दिलेला आहे.देशातील सर्वांच्या मताची किंमत सारखीच आहे.आपण मतदान करून योग्य उमेदवारास निवडू शकतो. देशाचा कारभार ,राज्याचा कारभार योग्य व्यक्तीच्या हाती देणे आपल्या हातात आहे. आणि म्हणून मतदानाचे पवित्र कर्तव्य प्रत्येकाने पार पाडले पाहिजे, असे आवाहन तहसीलदार वाडकर यांनी केले. त्याचबरोबर आपण सर्व शेतकरी कुटुंबातील किंवा शेती व्यवसायाची निगडित असल्यामुळे आपणास ई पीक पाहणी ऑनलाइन पद्धतीने नोंदविता येणे आवश्यक आहे. तसेच गावातील ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत त्यांना देखील आपण मदत केली पाहिजे. मतदार नोंदणी देखील ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने सहज करता येते. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा चार्ज पडत नाही. बाबूजी आव्हाड महाविद्यालयातील नव मतदार नोंदणी चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे तहसीलदार वाडकर यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे होते.त्यांनी देखील विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदवण्याचे आवाहन केले. तसेच मतदान प्रक्रियेत भाग घेणे कसे महत्त्वाचे आहे हे पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. अशोक कानडे यांनी केले तर आभार प्रा. सचिन पालवे यांनी मानले.
Tags :
10720
10





