महाराष्ट्र
105189
10
शेवगाव शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये "शासन आपल्या दारी"
By Admin
शेवगाव शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये "शासन आपल्या दारी" या योजनेअंतर्गत 400 लाभार्थ्यांनी घेतला लाभकार्यक्रमा ला मिळाला भरभरून प्रतिसाद, भा. ज. पा. नेते सामाजिक कार्यकर्ते नितीन दहिवाळकर यांनी स्वखर्चातून केले कार्यक्रमाचे आयोजन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील नागरिकांसाठी प्रभाग क्रमांक सात मध्ये वृंदावन गार्डन समोरील मोकळ्या जागेत शेवगाव शहरातील नागरिकां साठी कायम रक्तदान शिबीर आधारकार्ड बनवणे मतदानकार्ड बनवणे आरोग्याविषयी वारंवार शिबिरे घेणारे सामाजिक कार्यकर्ते नितीन दहिवाळकर यांनी शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत दिनांक 05 फेब्रुवारी 2023 सोमवार रोजी शेवगाव महसूल विभाग ,आरोग्य विभाग, नगरपरिषद प्रशासन ,पुरवठा विभाग { स्वस्त धान्य वितरण } यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन आयुष्यमान भारत कार्ड बनवणे, रेशन कार्ड ऑनलाईन करणे, रेशनकार्ड मधील नावे कमी किंवा समाविष्ठ करणे, नवीन मतदान कार्ड बनवणे, घरकुल योजनेतील कागदपत्र जमा करणे आधी काम विनामूल्य वृंदावन गार्डन गणपती मंदिरासमोर आपल्या प्रभागामध्ये यशस्वीपणे राबवून सुमारे 400 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळवून दिला
यावेळी शेवगावचे तहसीलदार,,,प्रशांत सांगडे गटविकास अधिकारी--राजेश कदम पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे
नगरपरिषद च्या कर निरीक्षक सोनाली शिरसाट श्रीनिवास आव्हाड मंडल अधिकारी किशोर पवार तलाठी पुरवठा विभाग पवार म्याडम आदी अधिकारी आणि कर्मचारी दिवसभर ठाण मांडून होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीअविनाश गवते, मिलिंद धोंडे,चरण परदेशी,किशोर नागरे ,नितीन शेळके, संतोष भुजबळ,दिनेश कळंबे, गणेश जाधव, सचिन शेळके,गणेश कदम ,किरण काथवटे, देविदास हुशार,गोपाळ गवळी, संतोष पानखडे, संतोष उन्मेग ,सागरनागरे,सचिन वाघ,विठ्ठल तुपे,भैय्या मरकड ,बाळासाहेब शेळके,शैलेंद्र तारू, गणेश शिंदे,स्वप्नील भडके, भाऊ साबळे,अर्जुन बायस, आदींसह अनेकांनी सहकार्य केले कार्यक्रमामध्ये 750 नागरिक सहभागी झाले होते
भाजपचे नेते सामाजिक कार्यकर्ते श्री. नितीन सुनील दहिवाळकर हे कायम आपल्या प्रभागामध्ये रक्तदान शिबिर , आधार कार्ड शिबिर, नवीन मतदान कार्ड शिबिर ,सांस्कृतिक कार्यक्रम अबाल वृद्ध महिला आणि तरुणांसाठी विविध सामाजिक उपक्रम स्वखर्चातून कायम राबवत असतात त्यांच्या कुटुंबाकडे नगरसेवक पद असताना त्यांनी बंदिस्त गटारी पिण्याच्यापाण्याच्या नवीन पाईपलाईन ,नवीनरस्ते,रस्त्याच्या कडेने सर्वत्र हायमास्ट बसविले आहेत,बहुतांश ठिकाणी सी. सी. टीव्ही बसविले आहेत तसेच आपल्या शेवगाव तालुक्यातील पाहिले व तालुक्यात एकमेव असलेल्या वृंदावन गार्डन ची निर्मिती त्यांनी केलेली आहे,गार्डन मध्ये जॉगिंग ट्रॅक,लहान मुलांसाठी मुबलक खेळण्या, स्वतंत्र स्वच्छता गृह,लॉन, आकर्षक कमानी, बसण्या साठी मुबलक बाकडे,आकर्षक फुल झाडे आहेत गार्डन नेहमी लहान मुले, आबालवृद्ध,महिलांनी भरलेले असते, त्यांनी आपल्या कार्यातून विकासकामे कशी असतात हे दाखवून दिले आहे.
Tags :
105189
10





