शिक्षकेत्तर महामंडळाचे 51वे अधिवेशन सावंतवाडीला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाचे अधिवेशन व चर्चा सत्र येत्या 7 जानेवारी 2024 रोजी सावंतवाडी जिल्हा-सिंधूदूर्ग येथे अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व हजारो शिक्षकेत्तर बांधव व भगिनींच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
तरी या अधिवेशनास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे अहवान नाशिक विभागीय सचिव गोवर्धन पांडूळे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष- तोडमल,सचिव भानुदास दळवी व संपूर्ण जिल्हा कार्यकारणीने केले आहे.
जिमखाना मैदान सावंतवाडी येथे पार पडणार्या या अधिवेशनास शालेय शिक्षण मंत्री ना.दिपक केसकर,केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे,सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री ना.रविंद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, आमदार जयंत आसनांवर,आमदार विक्रम काळे ,आमदार रविंद्र धंगेकर, आमदार वैभव नाईक, आमदार रमेश पाटील, आमदार निरंजन डावखरे,आमदार नितेश राणे,आमदार सत्यजित तांबे,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,माजी खासदार सुधीर सावंत,सिंधुदुर्ग जिल्ह्या शिक्षणाधिकारी,राज्य सहकार्यवाह शिवाजी खांडेकर,राज्य अध्यक्ष, सर्व राज्य कमिटी,सर्व जिल्हा तालूका कार्यकारणी व हजारो शिक्षकेत्तर बंधू भगिनी उपस्थित राहणार आहेत.
महामंडळा मार्फत अनेक प्रश्न मार्गी लागले असून काही प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत.यावर अधिवेशनात सविस्तर चर्चा होऊन पुढील दिशा ठरणार आहे.यासाठी नगर जिल्यातून जास्तीत जास्त शिक्षकेत्तर बंधू भगिनींनी उपस्थित राहून सरकारला जाग आणावी असे आव्हान जिल्हाध्यक्ष तोडमल, सचिव दळवी, उपाध्यक्ष
व सर्व जिल्हा व तालूका कार्यकारणीने केले आहे.
या अधिवेशनास महाराष्ट्र भरातून हजारो बंधू भगिनी उपस्थित राहणार असल्याची माहीती आमोद नलगे यांनी दिली आहे.