धक्कादायक घटना; ५ वर्षीय मुलाची हत्या करून बापाची आत्महत्या, परिसरात खळबळ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
एका बापाने आपल्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नगरच्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा या गावात पित्याने आपल्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तर या व्यक्तीने बायकोलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने या प्रकरणात त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना पारनेर पोलीस (Police) स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
पोलिसांना माहिती मिळताच पोलीस पथक पिंपळगाव रोठा या गावात घटनास्थळी रवाना झाले आहेत. या मुलाच्या बापाच्या कृत्याने गावात खळबळ उडाली आहे.
घरगुती कारणातून ही घटना घडली असे ग्रामस्तांच्या चर्चेतून समोर येत आहे. मात्र, या घटनेचे अद्याप ठोस कारण अद्याप कळू शकलेले नाही. संतोष राघू रासकर असे मुलाची हत्या करणाऱ्या बापाचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
अहमदनगरच्या पिंपळगाव रोठा या गावात संतोष राघू रासकर याने त्याचा ५ वर्षाचा मुलगा आदिनाशची हत्या केली. संतोषने त्याच्या मुलाची हत्या करत स्वत: देखील आत्महत्या केली आहे. संतोषने त्याची बायको सुजाता संतोष रासकरला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
मात्र, या हल्ल्यात सुजाता या जखमी झाल्या. सुजाता यांच्यावर नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संतोषने हे भयंकर कृत्य का केलं, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.