प्रांत कार्यालयाला घातली कांद्याची माळ; दर घसरल्याने रस्ता रोको आंदोलन
पाथर्डी- प्रतिनिधी
कांद्याचे भाव कोसळल्याने पाथर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त ( farmer) शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयाला कांद्याच्या ( Onion) माळीचा हार घालून राज्य शासनाचा निषेध केला.
कांदा आणि कापूस या पिकाला हमीभाव मिळत नाही. तसेच शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली जात आहेत. या विरोधात केंद्र व राज्य सरकार निषेधात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव येथील प्रांत कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड. प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सरकार विरोधात घोषणाबाजी
या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, पिक विमा रक्कम मिळाली पाहिजे; अशी आंदोलकांनी मागणी केली. तसेच चांगला भाव मिळत नसल्याने यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.