महाराष्ट्र
70835
10
निवडणुकीपूर्वी नगरमध्ये जोरदार दोन गटात राडा! प्राणघातक हल्ला
By Admin
निवडणुकीपूर्वी नगरमध्ये जोरदार दोन गटात राडा! प्राणघातक हल्ला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज्यात उद्या 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघांचा समावेश आहे.
दरम्यान, मतदानापूर्वीच अहमदनगरमध्ये जोरदार राडा झाल्याचं समोर आलं आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे विरोधात काम करुनही महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके सचिन जाधव यांनी रूग्णालयात जाऊन जाधव यांची विचारपूस केली. यावेळी लंके यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
अहमदनगरमध्ये गुंडागर्दी वाढली : निलेश लंके
टप्प्यातील मतदान होणार आहे. शहराच्या मंगल गेट परिसरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख सचिन जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. तसेच सचिन जाधव यांच्या ऑफिसची देखील यावेळी तोडफोड करण्यात आली. त्याचबरोबर वाहनांची देखील तोडफोड झाली आहे. सध्या घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सचिन जाधव यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी सचिन जाधव यांची भेट घेतली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले शहारात गुंडागर्दी कोणाची आहे हे समोर आले आहे. या निवडणुकीत माझ्या विरोधात काम केले. पण, माणुसकी म्हणून मी त्याना भेटीण्यासाठी आलो, असे वक्तव्य निलेश लंके यांनी केले आहे.
अहमदनगरमध्ये दोन गटात राडा
अहमदनगरमध्ये आज दोन गटात राडा झाला. हा राडा वैयक्तिक कारणातून झाल्याची माहिती मिळत आहे. या वादातून वाहनाची आणि कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. शिंदे गटाचे संपर्कप्रमुख तथा माजी नगरसेवक सचिन जाधव आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सागर मुर्तडकर यांच्या गटात ही हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे. दगडफेकीत सागर मुर्तडकर यांचे कार्यालय फुटले आहे. तसेच एक स्कार्पिओ देखील फोडण्यात आली. अहमदनगरच्या मंगलगेट परिसरात ही हाणामारी झाली आहे.
Tags :

