महाराष्ट्र
8726
10
एच आय व्ही एड्स जनजागृती साठी विविध कार्यक्रमाचे आयोजन
By Admin
एच आय व्ही एड्स जनजागृती साठी विविध कार्यक्रमाचे आयोजन
जिंगल स्पर्धेत प्रतिक वाखुरे आणि शाहिद पठाण यांचा प्रथम क्रमांक
पाथर्डी- प्रतिनिधी
राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय अहमदनगर कडून युवा वर्गामध्ये एचआयव्ही एड्स बाबत जनजागृती होण्याकरिता अहमदनगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता जिंगल स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.जिंगल स्पर्धेत जिल्ह्यातील २२ महाविद्यालयातील टीमने सहभाग घेतला होता. एच आय व्ही एड्स अनुषंगाने असणारा कलंक व भेदभाव या विषयावर आधारीत श्री आनंद महाविद्यालयाच्या प्रतिक वाखुरे आणि शाहीद पठाण या विद्यार्थ्यांनी तयार केलेली 'जिंगल' स्पर्धेमध्ये सहभागी केली होती. सदर स्पर्धेत प्रतिक वाखुरे आणि शाहीद पठाण यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. शेषराव पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.संस्थेच्या सर्व पदाधीकाऱ्यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिक तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी प्राचार्य डॅा. पवार म्हणाले की, तरूणांनी एच आय व्ही एड्स प्रतिबंध बाबतचे ज्ञान अवगत करून घेतल्यास, त्यांच्यापर्यंत एचआयव्हीचा संसर्ग येणार नाही, तसेच त्यांच्याकडून इतरांना, समाजातील विविध घटकांना माहिती पोहोचविली जाऊ शकते, म्हणून युवकांचा सहभाग यासाठी महत्त्वाचा आहे.
सदर जिंगल तयार करण्यासाठी महाविद्यालयाचे भौतिकशास्र विभागाचे प्रा. सुर्यकांत काळोंखे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या सत्कार प्रसंगी प्रा. डॅा ढुमणे, प्रा. डॅा गंभिरे, प्रा. डॅा. बरशिले, प्रा. डॅा. घोरपडे, प्रा. काळोखे, प्रा. बांगर, प्रा. डॅा. गाडे, प्रा. डॅा. खेडकर, प्रा. डॅा. भोर्डे व प्रा. डॅा. शेख उपस्थित होते.
Tags :

