सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पहिल्यांदा दादापाटील राजळे महाविद्यालयास संधी.-आमदार मोनिकाताई राजळे
पाथर्डी- प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यास मंडळ सदस्य पदी प्राचार्य डॉ . राजधर टेमकर यांचे निवडीबद्दल आमदार मोनिकाताई राजळे यांनी
प्राचार्य डॉ . राजधर टेमकर यांचा सन्मान केला.याप्रसंगी श्री विक्रम राजळे उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे,राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यास मंडळावर
डॉ .राजधर टेमकर यांच्या निवडीमुळे महाविद्यालयास पुणे विद्यापीठात प्रतिनिधित्व करण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त झाली. सर्व सामावेशक निर्णय , सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती व संयमी स्वभाव यातून त्यांच्या कार्याची पद्धत या सर्वांमुळे त्यांना हे यश मिळाले आहे. असे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.या यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा .आप्पासाहेब राजळे
महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा . शिवाजीराव राजळे , विश्वस्त मा . राहुल राजळे , संस्थेचे सचिव आर. जे . महाजन ,मार्गदर्शक, मा . जे .आर . पवार , आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव मा.भास्करराव गोरे , कृषी तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राचार्य डॉ . युवराज सूर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ . अतुल चौरपगार यांनी केले तर आभार डॉ . निर्मला काकडे यांनी मानले . यावेळी महाविद्यालयातील डॉ, महेबुब तांबोळी,डॉ जे.एन.नेहुल,डॉ एस.जे.देशमुख, डॉ राजू घोलप,प्रा.सी.पी.पानसरे, प्रा.शाम गरड,प्रा.अश़ोक ताठे व सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते .