महाराष्ट्र
25057
10
भाजपला धक्का... बबन पाचपुतेंचा पुतण्या साजन पाचपुते यांचा ठाकरे
By Admin
भाजपला धक्का... बबन पाचपुतेंचा पुतण्या साजन पाचपुते यांचा ठाकरे गटात प्रवेश
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पवार-कुटुंबातील काका-पुतण्याच्या राजकारणाने राज्याच्या राजकारण ढवळून निघाले असताना आता कधीकाळी शरदपवारांचे निष्ठावंत असलेले भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातही काका-पुतण्यामधील संघर्ष सुरू झाला आहे.
बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पातपुते यांनीआजशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.मागील ग्रामपंचायत निवडणुकीतसाजन यांनीकाकांना सोडून राजकारण करत सरपंचपद मिळविले होते.
साजन सातपुते यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली असतानाच पाचपुते यांनी ठाकरे गटाची निवड केली. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाची नगर जिल्ह्यात ताकद वाढली आहे.
काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या नगर जिल्ह्यातील काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत साजन यांनी बबनराव पाचपुते यांचे पुत्र प्रतापसिंह यांचा पराभव केला होता. साजन यांनी बहुमताने विजय मिळवत राजकारणात स्वतंत्रपणे प्रवेश केला.
त्यानंतर साजन पाचपुते यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुध्द लढवून जिंकली. गावचे सरपंच व बाजार समितीचे संचालक ही पदे असतानाही राजकीयदृष्ट्या साजन पाचपुते कुठल्याही पक्षात नव्हते.अशातच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून पाचपुते यांची मुंबईत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली होती. त्यानंतर आज त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे.
सोमवारी सायंकाळी मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला. उद्धव ठाकरे यांनी सातपुतेंना शिवबंधन बांधले. पाचपुते यांच्यावर शिवसेनेकडून मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि भाजपचे वर्चस्व वाढत असलेल्या नगर जिल्ह्यात ठाकरे यांची शिवसेना पिछाडीवर पडली होती. त्यादृष्टीने पक्षाबांधणीला सुरवात करीत नवीन चेहरे पक्षात आणण्यास सुरवात केली आहे.पाचपुते यांच्या रुपानेठाकरे गटाला श्रीगोंदा तालुक्यात आणि जिल्ह्याच्या दक्षिण भागात तरुण नेतृत्व मिळालं आहे
Tags :
25057
10





