शंकरराव गडाखांच्या गटाचा 18 जांगावर दणदणीत विजय; महाविकास आघाडीचा विजय
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. त्यानंतर काही बाजार समित्यांचा निकालही आजच समोर येत आहेत. नेवासा बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे.
नेवासा बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटातील सर्वच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. नेवासा बाजार समितीच्या 18 जागांपैकी 18 जागा शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वातील पँनलने जिंकल्या आहेत.
भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांची नेवासा बाजार समितीच्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वातील पँनलने 18 पैकी 18 जांगावर दणदणीत विजय मिळवला आहे.
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंना यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावूनही माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा बाजार समितीत एक हाती सत्ता राखली आहे.
दरम्यान, नेवासा बाजार समितीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वातील पँनलने वर्चस्व राखलं आहे.