कवडदरा विद्यालयात मानव विकास कार्यक्रम अंतर्गत सायकल वाटप
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेजमध्ये
मानव विकास कार्यक्रम सन 2022-23 या वर्षात शाळेत
0 ते 5 कि.मी. अंतरावरुन शाळेत पायी येणाऱ्या इयत्ता 8 वी ते 10 पर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलींना मोफत सायकल वाटप
योजना अंतर्गत विद्यालयात (दि.18) जानेवारी रोजी सायकल वाटप करण्यात आले.
विद्यालयातील एकूण 48 मुलींना सायकल वाटप करण्यात आले.
मानव विकास अंतर्गत मुलींना सायकल मिळाल्याबद्ल चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून आला. सायकल मिळाल्याने पाच कि.मी. पेक्षा जास्त अंतरावरुन येणाऱ्या मुलींना पायी चालण्याच्या ञास होणार नाही.तसेच मुलींचा शारीरिक व्यायाम होणार असून सायकल आनंदाने चालवणार आहेत.
सायकल वाटप प्रसंगी विद्यालयात
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,गावातील तसेच परीसरातील ग्रामस्थ,शाळेतील विद्यार्थी , उपस्थित होते.