महाराष्ट्र
26158
10
जिल्हापरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात तोडफोड
By Admin
जिल्हापरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात तोडफोड
जलजीवनचे काम निकृष्ठ: पाईपलाईनची ट्रायल पीट व चाचणी करून पुढील काम सुरू करण्याची मागणी
नगर सिटीझन live टीम प्रतिनिधी
बिल कामाची शहानिषा केल्या शिवाय अदा करू नये तसेच स्वतः अधिकाऱ्यांनी सर्व खड्डे चाचणी घ्यावी. या मागणीसाठी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे यांना अनेकवेळा निवेदन दिले होते. मात्र अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीच दखल न घेतल्याने गुरूवारी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय फोडले. तसेच आगामी १५ दिवसात भातोडी पारगाव, कोल्हवाडी, होतोळण येथील येथील पाईपलाईन चेक केली नाही तर पुढचे आंदोलन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात करण्याचा इशारा पोटे यांनी दिला.
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात तोडफोड
जलजीवनचे काम निकृष्ठ: पाईपलाईनची ट्रायल पीट व चाचणी करून पुढील काम सुरू करण्याची मागणी
प्रशासनाची बदनामी करण्याचा प्रयत्न
संबंधितांनी जिल्हा परिषदेला दिलेल्या तक्रार अर्जावर जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच कार्यवाही केलेली
असून, कोल्हेवाडी व हातवळण येथील या दोन्हर ठिकाणी एका त्रयस्थ यंत्रणेमार्फत गावचे सरपंच तसेच
सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत १२ डिसेंबर रोजी केले आहे. तक्रार अजांच्या अनुषंगाने कोल्हेवाड़ी
ग्रामपंचायतच्यावतीने सदर योजनेचे काम समाधानकारक झाले असल्याचा अहवाल आला आहे. तसेच
ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग अहमदनगर यांच्याकडून देखील अहवाल मागवला आहे. त्यामुळे दोन महिने
जिल्हा परिषदेकडून कोणतीही कारवाई झाली नाही असे म्हणणे चुकीचे असून प्रशासनाची जाणीवपूर्वक
बदनामी करून अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा दिसतो. प्रशासन अशा
हल्ल्यांचा निषेध नोंदवत असून आपण नियमानुसार काम करत राहणार,
- आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.
दरम्यान पोटे यांनी यावेळी
असल्याने त्यावरून जड वाहतूक झाली, नांगरट किंवा पाण्याच्या अती दाबाने काही महिन्यांतच ही सर्व पाईपलाईन फुटेल यात अजिबात शंका नाही. हे काम खराब झालेले असताना देखील, ठेकदारास जवळपास दहा टक्के बिल अदा केलेले आहे. संबंधीत या योजनेतील कुठलेही बिल कामाची शहानिषा केल्या शिवाय अदा करू नये तसेच स्वतः अधिकारी या सर्व (ट्रायल पीट) खड्डे चाचणी घ्यावी व खड्डे चाचणी येणाऱ्या आठ दिवसांत करावी. या मागणीसाठी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे यांना अनेकवेळा निवेदन देण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक दखल घेतली
अधिकारी फोन उचलत नाही
नगर तालुक्यातील जलजीवनच्या कामायावत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गडदे यांना पोटे यांनी काम निकृष्ट होत असल्याबाबतचे अनेक पुरावे दिले होते, व संबंचितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र गडदे यांनी त्यांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही, तसेच पोटे यांचा पाच ते सहा दिवस फोन देखील उचलला नाही, गुरूवारी पोटे जिल्हा परिषदेत आले असता सदरचे कार्यालयाच १५ दिवसांपासून बंद असल्याचे निदर्शनास आल्याने संतप्त झालेल्या पोटे यांनी तोडफोड केली.
Ahmednagar Edition
याबाबत अधिक माहिती अशी, मागील ६ महिन्यांपूर्वी नगर तालुक्यातील घोसपुरी जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे
काम सुरू करण्यात आले असून, या घोसपुरी योजने अंतर्गत १५ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामध्ये ७ नवीन टाक्यांचे व मोठ्या प्रमाणात नवीन पाईपलाईनचे काम चालु केले आहे. मागील आठवड्यात जनआधार सामाजिक संघटनेच्या बतीने शासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत घोसपुरी योजनेत
समाविष्ट असणाऱ्या बाबुडर्डी घुमट येथील पाईपलाईन पुन्हा खोदून काढली (ट्रायल पीट) असता त्या ठिकाणी केवळ एक ते दीड फूट एवढीच पाईपलाईन जमिनीत गाडली असल्याचे आढळले. शासकिय नियमानुसार पाईपलाईन हो, जमिन मुरमाड, खडकाळ किंवा काळी मातीची असली तरीही त्या पृष्ठभागापासून किमान
१.१४ मीटर (३ फूट ९ इंच) इतकी खोल असावी. शासननाने हे सर्व निकष लक्षात घेऊनच या योजनेसाठी तब्बल ५ हजार कोटी रुपये एवढा निधी जिल्ह्यासाठी मंजूर केला आहे. परंतु ठेकेदार हा पैसा वाचवण्याच्या हेतूने आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाईपलाईन फूटभर देखील जमिनीत गाडत नाही. पाईप वरवर
जलजीवन योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळत असून देखील ठेकेदार अतिशय निकृष्ठ पदप्तीने काम करत आहे, याचाबत तक्रार करून देखील अधिकारी कारवाई करत नाहीत. तरी पुढील १५ दिवसात नगर तालुक्यातील भातोडी पारगाव, कोल्हवाडी, होतोळण वेथील येथील पाईपलाईन चेक करून चुकीच्या पद्धतीने केलेली पाईपलाईन परत केली नाही तर पुढचे आंदोलन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात केले जाईल व त्याची जबाबदारी सीईओ यांच्यावरच असेल असा इशारा पोटे यांनी यावेळी दिला.
नसल्याच्या निषेधार्थ गुरूवारी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय फोडले. दरम्यान पोटे यांना कोतवाली पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags :
26158
10





