पेट्रोल डिझेलच्या उच्चांकी दरवाढीने सर्वसामान्य जनता वेठीस
By Admin
पेट्रोल डिझेलच्या उच्चांकी दरवाढीने सर्वसामान्य जनता वेठीस
नगर सिटीझन live team-
केंद्र सरकारने विना चर्चेने पास केलेले शेतकरी व कामगार विरोधी कायदे तातडीने मागे घ्यावे.तसेच दिल्लीच्या सीमेवर मागील शंभर दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकर्यांना पाठिंबा देत डिझेल,पेट्रोल व गॅसची भरमसाठ होत असलेल्या भाववाढीच्या निषेधार्थ संगमनेर मध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व आ.डॉ.सुधीर तांबे आणि विविध पदाधिकार्यांच्या उपस्थितीत लाक्षणिक धरणे आंदोलन संपन्न झाले. यावेळी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य माणूस वेठीस धरला जात असल्याची टीका आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. नवीन नगर रोड प्रांत अधिकारी कार्यालय येथे संगमनेर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आ.डॉ.सुधीर तांबे,नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे. तालुका कॉग्रसचे अध्यक्ष बाबा ओहोळ,इंद्रजीत भाऊ थोरात,सभापती सुनंदा जोर्वेकर,उपसभापती नवनाथ आरगडे, शिवाजी जगताप, सौ सुनंदाताई जोर्वेकर,संतोष हासे,दत्तू खुळे,बाळासाहेब पवार,नवनाथ आंधळे,साहेबराव गडाख, मोहनराव करंजकर,विलास नवले,आनंद वर्पे,सुभाष गुंजाळ,अॅड.त्र्यंबक गडाख,सोमेश्वर दिवटे, अॅड.मधुकर गुंजाळ, शिवाजी वलवे,शिवाजी गोसावी,तात्या कुटे आदी उपस्थित होते.याप्रसंगी केंद्र सरकारच्या विविध धोरणांविरुद्ध घोषणा देण्यात आल्या.तसेच पेट्रोल व डिझेलची भाववाढ मागे घेऊन केंद्राने पास केलेले तिन कायदे रद्दद्द करावे त्याचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना देण्यात आले.याप्रसंगी आ.डॉ.तांबे म्हणाले की, १३२ कोटींच्या देशांमध्ये शेतकरी हा देशाचा व जगाचा पोशिंदा आहे. मात्र केंद्राने कायम त्याच्या विरोधी धोरणे घेतले असून नुकतेच पास केलेले तीनही कायदे शेतकरी व कामगारांना देशोधडीला लावणारे आहे. या कायद्यामुळे खाजगीकरणाला प्रचंड प्रोत्साहन मिळणार असून हे कायदे फक्त अदानी व अंबानी सारख्या बड्या उद्योगपतींसाठी आहे. कायदे करण्यापूर्वीच या उद्योगपतींनी गोडाऊन बांधले होते हे कशाचे लक्षण आहे. केंद्र सरकार सात त्याने मुठभर लोकांसाठी काम करत आहे. याविरुद्ध देशातील शेतकरी पेटून उठला आहे. मात्र केंद्र सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही.
आरोग्य, शिक्षण,संरक्षण यावर बजेटमध्ये कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. अर्थ व्यवस्था डबघाईला आली आहे. देशात राजकीय व सामाजिक अस्थिरता वाढली आहे.नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दिवसेंदिवस होणारी पेट्रोल व डिझेलची दरवाढ सामान्यांच्या खिशाला झळ देणारी असून काँग्रेस पक्षाने सातत्याने या भाववाढीला विरोध केला आहे रायामध्ये महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष प्रखर विरोध करत आहेत. आज देशभरात व अहमदनगर जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विरुद्ध तीव्र आंदोलन होत असून पेट्रोल डिझेलची भाववाढ व काळे कायदे मागे न घेतल्यास काँग्रेसच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आमदार डॉ. तांबे यांनी दिला.तर बाबा ओहोळ म्हणाले की,श्रीमती सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस पक्ष जनसामान्यांच्या विकासाचे काम करत आहे. सातत्याने होणारी भाववाढ ही सामान्यां ना परवडणारी नाही. लोकांना आता अच्छे दिन नको सच्चे दिन पाहिजे. भाव वाढ करून केंद्र सरकार भांडवलदारांचा फायदा करत आहेत.यात प्रचंड नफेखोरी होत आहे असे ही ते यावेळी म्हणाले.दुर्गा तांबे म्हणाल्या की, सध्या देशात धार्मिक द्वेषातून समाजामध्ये
वितुष्ट निर्माण होत आहे. सामाजिक तेढ निर्माण होत असून देशात गरीब,सर्वसामान्य,महिला अजिबात सुरक्षित नाही.तर इंद्रजितभाऊ थोरात म्हणाले की, मोदी सरकारने जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून दुसर्याच प्रश्नांवर जनतेचे लक्ष केंद्रित केले जात आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. तर यावेळी नवनाथ आरगडे,शिवाजी जगताप,शिवाजी वलवे,विष्णूपंत राहटळ,मिनानाथ वर्पे,तान्हाजी शिरतार आदींनी मनोगत व्यक्त केले.