शिवरायांचा वारसा पुढे चालवणे हीच खरी शिवजयंती- प.पु.माधव बाबा
मनसेच्या वतीने पाथर्डी शहरात महाराजांना अभिवादन
पाथर्डी- प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांनी आपल्या आचरणातून सत्य,नीती व सदाचाराची जी शिकवण दिली त्याचा वारसा पुढील पिढीने चालवावा व हीच खरी शिवजयंती साजरी केलेली महाराजांना अधिक आवडेल, असे प्रतिपादन सद्गुरू शंकर महाराज मठाचे अधिपती प.पु. माधवबाबा यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील नवीन बस स्थानक चौकात आयोजीत करण्यात आलेल्या छ.शिवाजी महाराज जयंती अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी त्यांनी शिवजयंती च्या बदललेल्या स्वरूपावर भाष्य करतांना सांगीतले की, डी जे लावून विक्षिप्तपणे नाच करून छत्रपतींचा विचार समजला जाऊ शकत नाही, त्यासाठी शिवजयंती नाचून नव्हे तर थोरामोठ्यांचे जीवनचरित्र वाचुन साजरी करण्याचे आवाहन केले.
मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांनी प्रास्ताविक करतांना सांगीतले की, विद्यार्थ्यांना इतिहास हा विषय शिकवला जात असतांना खिलजी,मुघल,बहमनी राजवट यावरच अधिक शिकवले जाते.वास्तविकत: या क्रूर,अन्यायी,हिंदू धर्म द्वेष करणाऱ्या जुलमी राज्यकर्त्यापेक्षा शिवछत्रपतींचा जीवनपट अभ्यासक्रमातून विस्तृतपणे शिकवला गेल्यास, आजचा युवक हा खऱ्या अर्थाने निडर,देश, धर्माभिमानी व चारित्रवान होऊ शकतो. शिवाजी महाराजांचें जीवनसार समजलेला युवक हा स्त्रीला माता भगिनी समजून तिचे रक्षण करणाराच असेल इतकी क्षमता शिवचरित्रात आहे.
यावेळी मनसे परिवहन सेनेचे अविनाश पालवे,विदयार्थी सेनेचे प्रविण शिरसाट,शहर सचिव संदीप काकडे, शहरातील प्रतिष्ठीत व्यावसायिक सोमशेठ जिरेसाळ,दिलिप गायकवाड,अनुप उगार,पुंडलिक गर्जे,संदेश बाहेती,विशाल कोकाटे,राजेंद्र चोरडिया,वैभव भडके आदीसह शिवभक्त उपस्थित होते.
शेवटी आभार शहर सचिव संदीप काकडे यांनी मानले.