कवडदरा विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज
येथील इयत्ता १० च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. कवडदरा-भरवीर खुर्द गृप ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.अश्विनी भोईर तसेच विद्यालयाचे प्राचार्य व्ही.एम.कांबळे सर यावेळी उपस्थित होते.
यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा फुल व भेटवस्तू देऊन सन्मान केला.तसेच विद्यालयास भेटवस्तू दिली.यावेळी शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच भावपुर्ण निरोप दिला.यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यालय प्रती स्नेह भावना व्यक्त केल्या.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.